भारतीय संस्कृती मध्ये सर्व धर्म- समभावाचे दर्शन घडते– डॉ. श्रीपाल सबनीस

भारतीय संस्कृती मध्ये सर्व धर्म- समभावाचे दर्शन घडते– डॉ. श्रीपाल सबनीस


तळेगाव दाभाडे दि. ५ (प्रतिनिधी)

“माणसाचे बंधुतेत रूपांतर करण्याचे काम भारतीय संस्कृतीने केले आहे. धर्म ही शुद्ध कल्पना आहे. मुक्तीची कल्पना आहे. सर्व धर्मातील चांगुलपणा म्हणजे भारतीय संस्कृती होय. चांगुलपणाची विभागणी करून चालत नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानेश्वरांच्या ओवीला बहिष्कृत भारतात डोक्यावर घेतात, हा संवाद आपण लक्षात घेणार आहोत की नाही,” असे प्रतिपादन 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.



तळेगाव दाभाडे येथे इंद्रायणी विद्या मंदिर संस्था आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेत तिसऱ्या सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आर्थिक विकास मंडळ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर होते.

यावेळी व्यासपीठावर इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, उपाध्यक्ष दीपक शहा, गोरखभाऊ काळोखे,कार्यवाहक चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा,सदस्य गणेश खांडगे,संदीप काकडे,युवराज काकडे, रणजीत काकडे,विलास काळोखे, निरुपा कानिटकर, स्थानिक विकास समिती सदस्य परेश पारेख, माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य संदीप भोसले, डी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य जी एस शिंदे, अन्य संस्था पदाधिकारी तसेच तळेगाव पंचक्रोशीतील नागरिक,पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश