संशोधनामुळे भारतदेशाचा विकास – उदय निरगुडकर
तळेगाव दाभाडे दि.६ (प्रतिनिधी)
भारतातील तरूण संशोधकांमुळे नविन तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यामुळे भारत देश हा जगात अव्वल स्थानी आपल्याला दिसेल असे भाकित जेष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी केले.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मावळ भुषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प गुंफताना श्री निरगुडकर हे बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार डाॅ शैलेश गुजर हे होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा,संचालक युवराज काकडे,संदिप काकडे,विलास काळोखे,माजी नगराध्यक्ष ॲड रविंद्र दाभाडे,निरुपा कानिटकर,प्राचार्य डॉ संभाजी मलघे, राजश्री म्हस्के, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, माजी नगरसेवक संतोष भेगडे, भाजपाचे प्रभारी भास्कर म्हाळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment