मानवी मेंदूच्या क्षमतेपेक्षा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आविष्कार वेगाने - पृथ्वीराज चव्हाण

मानवी मेंदूच्या क्षमतेपेक्षा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आविष्कार वेगाने  - पृथ्वीराज चव्हाण 


तळेगाव स्टेशन दिनांक 3 (वार्ताहर) मानवी मेंदूच्या क्षमतेपेक्षा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आविष्कार वेगाने काम करतो ही सकारात्मक बाब असताना त्यापासून होणाऱ्या तोटयांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता ही प्रचंड वेगाने घडणारी क्रांती असून ती प्रत्येकाला कसे प्रभावित करू शकेल हे अद्याप अनिश्चित आहे. असे मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्था आयोजित नवव्या मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे (Talegaon Dabhade)दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. व्याख्यानमालेत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या बी फार्मसी महाविद्यालयाला कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च असे नाव देण्यात आले.हा नामकरण सोहळा पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते पार पडला.


याप्रसंगी अध्यक्षस्थानी त्रिदल पुणेचे डॉ.सतिश देसाई हे उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे,उपाध्यक्ष डाॅ. दीपक शहा, कार्यवाह चंद्रकांत शेटे,खजिनदार शैलेश शहा,यशोदा शिक्षण संस्थेचे दशरथ सगरे,पै चंद्रकांत सातकर, राजश्री म्हस्के,सदस्य निरुपा कानिटकर, गणेश खांडगे,विलास काळोखे,संजय साने,परेश पारेख,संदीप काकडे,रणजीत काकडे,युवराज काकडे, प्राचार्य डॉ.संभाजी मलघे,डी फार्मसीचे प्राचार्य जी एस शिंदे, प्राचार्य डॉ.रुपेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेकडून दिला जाणारा क्रीडा पुरस्कार पै.चंद्रकांत सातकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या या आविष्कारासोबत आपल्याला जुळवून घ्यावे लागेल. यात जितक्या संधी आहेत तितके धोकेही आहेत.हे तंत्रज्ञान मानवाने जरी तयार केलेले असले तरी ते माणसापेक्षा जास्त शहाणं झालं तर काय.? या प्रश्नाचे उत्तर आज जगात कोणाकडे नाही त्यामुळे यातून उद्भवू शकणाऱ्या धोक्यांकडे डोळेझाक करून चालणार नाही. यामुळे रोजगारावर परिमाण होऊ शकतात. भविष्यात नोकऱ्या राहतील की नाही याची शाश्वती नाही असे श्री चव्हाण म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी केले. यावेळी ते म्हणाले की,या महाविद्यालयात साडेसहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.राष्ट्राच्या हितासाठी विद्यार्थ्यांना घडविणे हा शिक्षणाचा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून भेगडे साहेबांनी संस्था मोठी केली.पुण्याच्या तोडीचे शिक्षण आज या तालुक्यात मिळते आहे ही मोठी बाब आहे. तसेच समाजकारणातील कृष्णराव भेगडे हे मोठे विद्यापीठ असल्याचे काकडे म्हणाले.

यावेळी प्रायोजक उद्योजक राजेश म्हस्के, नंदकुमार शेलार,अजिंक्य काळभोर, सागर पवार,विक्रम काकडे,किरण काकडे यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.तर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश