सौ. स्नेहल दत्तात्रेय बाळसराफ शैक्षणिक कार्यासाठी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

 सौ. स्नेहल दत्तात्रेय बाळसराफ शैक्षणिक कार्यासाठी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित


तळेगाव दाभाडे दि.७  (प्रतिनिधी)

सावित्रीबाई फुले यांच्या यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यकारणी समिती पुणे जिल्हा यांच्या वतीने उरुळी कांचन येथे सौ स्नेहल दत्तात्रय बाळसराफ यांचा समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्र शासनाचे महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे तसेच मा. रवींद्र चव्हाण संचालक यशदा व बार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना स्नेहल बाळसराफ यांनी 'सावित्रीबाई फुले स्त्री उद्धारकाच्या आद्य प्रवर्तक' या विषयावर व्याख्यान झाले यावेळी भाषणामध्ये त्यांनी फुले दांपत्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाची इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने नोंद झालेली आहे, असे मत प्रतिपादन केले.  शूद्र व अतिशूद्र तसेच महिला यांच्या सर्वांगीण विकासासाठी सावित्रीबाई फुले यांनी प्रचंड विरोध पत्करून प्रसंगी शेण-गोटे यांचा मारा सहन करून महिलांना शिकवण्याचे महान कार्य केले आणि शूद्रांना व महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणले. शिक्षणाबरोबर समाजातील अनेक अनिष्ट प्रथा व वृत्ती परंपरा यांच्यावर कडाडून प्रहार केला. स्त्रियांचा गुदमरलेला श्वास मोकळा करून दिला. यामुळेच पुणे विद्यापीठाचे आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. ही त्यांच्या महान कार्याची पावती होय. आपणही सावित्रीबाई फुले यांचा  वसा वारसा चालू ठेवावा असे आवाहन सौ. बाळसराफ यांनी केले याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यकारणी चे अध्यक्ष श्री भिमराव धिवार, अशोकराव नाळे,  प्राचार्य डॉ. बाळसराफ, विजय रोकडे, एम. जी शेलार श्री. रा. वी शिशुपळ, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश