अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ चे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न

अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ चे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न


तळेगाव दाभाडे दि ३ (प्रतिनिधी)

वडगाव मावळ येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ व आयक्यूएसी यांच्या विद्यमाने आयोजित स्वयं अर्थसहाय्यित दोन दिवसीय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर करंजगाव ता. मावळ या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. सदर विशेष हिवाळी  शिबिराचे आयोजन समाजसेवा विभाग प्रमुख डॉ. शीतल देवळालकर यांनी केले होते. शिबिराचे  उद्घाटन सरपंच वैशाली कुटे, माजी सरपंच दिपाली साबळे,  शाळा समिती अध्यक्ष अमोल शेलार व दत्तात्रय कुटे यांच्या हस्ते झाले.


सदर शिबिरात  बीएड व एम. एड प्रशिक्षणार्थींना ग्रामीण जीवनाची ओळख, ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण , सामाजिक जनजागृती , अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध विषयांवर काम करण्याची संधी मिळाली. 

                  शिबिरातील क्षणचित्रे 
 वृक्षारोपण 

          ऐतिहासिक तळे परिसर स्वच्छता
                    सांस्कृतिक कार्यक्रम
          जिल्हा परिषद शाळा फरशी बसवणे
                 योगा, प्राणायाम व प्रार्थना

दोन दिवसांमध्ये करंजगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात जागा साफ करून फरशा बसवण्यात आल्या.  ऐतिहासिक तळे परिसरामध्ये साफसफाई करण्यात आली तसेच नवीन ग्रामपंचायत इमारती समोर वृक्षारोपण करण्यात आले.  पहिल्या दिवशी लिली इंग्लिश मिडीयम स्कूल  प्राचार्य चेतन देशमुख यांचे "भावी शिक्षक व त्यांच्या समोरील आव्हाने" या विषयावर व्याख्यान झाले दुसऱ्या दिवशी गुरुकुल हायस्कूल लोणावळा येथील रंगनाथ वरे सर यांचे "पर्यावरण जागृती व साप समज व गैरसमज" या विषयावर व्याख्यान झाले. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर व्याख्यानांस व विविध कामांमध्ये तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी करंजगाव ग्रामस्थांकडून व  विद्यार्थ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला.

शिबिराचा समारोप शिबिराचे  उद्घाटन सरपंच वैशाली कुटे, शाळा समिती अध्यक्ष अमोल शेलार व दत्तात्रय कुटे, ग्रामस्थ व माजी विद्यार्थी संतोष टाकवे, श्री. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तुकाराम असवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, युवा नेते राज खांडभोर यांच्या उपस्थितीत झाला. सदर शिबिर पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे, सहा.प्रा. महादेव सांगळे, डॉ. कविता तोटे, डॉ.संदीप गाडेकर, डॉ.शीतल देवळालकर, सहा.प्रा.ज्योती रणदिवे, सहा.प्रा. सोनाली पाटील, डॉ. अनुप्रिया कुमारी , ग्रंथपाल सुजाता जाधव , सुरेश घोजगे,मंगल सस्ते,  विनायक येळवंडे, सोमनाथ धोंगडे, संतोष ढमाले व बी.एड.व एम.एड. चे विद्यार्थी शिक्षक यांनी परिश्रम घेतले व त्यास गावकऱ्यांचे सहकार्य लाभले. सदर शिबिर यशस्वीरित्या पार पाडल्या बद्दल अध्यक्ष तुकाराम असवले व सचिव अशोकजी बाफना यांनी सर्वांचे कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश