शिवजयंती ही नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करावी - शिवव्याख्याते संपत गारगोटे
तळेगाव स्टेशन दि.21 (वार्ताहर)
शिवजयंती उत्सव हा नाचून साजरा करण्यापेक्षा वाचून साजरा करावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मनामनात व घराघरात पोहचावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे. जगात शिवजयंती विचाराने साजरी केली जाते, युवक डीजे लावून जयंती साजरी करतात. शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करा हीच खरी शिवजयंती होईल असे प्रतिपादन शिवव्याख्याते संपत गारगोटे यांनी केले.
येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ कला वाणिज्य बीबीए महाविद्यालयात बुधवारी (दि.21) शिवजयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
शिव पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शिवजयंती उत्सवानिमित्त ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर ते महाविद्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. व्याख्यान झाल्यावर विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिवजयंती कार्यक्रमाचे नियोजन करण्यात पुढाकार घेतला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, संचालक प्रल्हाद जांभुळकर, दत्तात्रय असवले, प्राचार्य अशोक गायकवाड, प्रा. महादेव वाघमारे, डॉ.शीतल दुर्गाडे, प्रा. शीतल शिंदे, प्रा.रोहिणी चंदनशिवे, प्रा. योगेश जाधव, प्रा. जया धावारे, प्रा. संतोष शिंदे, प्रा. अशोक कोकाळे, प्रा.सुखदेव जाधव, प्रा. अनिल कोद्रे, अनिता भांबळ, मंगल सस्ते व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment