शिवजयंती निमित्त सिंहगडावर ट्रेकिंग पलटन पुणे तर्फे प्लास्टिक मुक्त अभियान

 शिवजयंती निमित्त सिंहगडावर ट्रेकिंग पलटन पुणे तर्फे प्लास्टिक मुक्त अभियान



पुणे दि. २१(प्रतिनिधी) औचित्य साधून  9 फेब्रुवारी 2024 रोजी ट्रेकिंग फलटण पुणे ग्रुप तर्फे सिंहगडावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले यामध्ये ऋणी दरवाजा कल्याण दरवाजा झुंजार बुरुज तानाजी कदम राजाराम महाराज समाधी नरवीर तानाजी समाधी आणि अतकरवाडी तर्फे पुणे दरवाजापर्यंत जाणारी गडवाट यावरील पर्यटकांनी फेकून दिलेले प्लास्टिक गोळा करण्यात आले. 



ट्रेकिंग फलटण तर्फे 2020 पासून शिवजयंतीच्या निमित्याने सिंहगडावर दरवर्षी स्वच्छता मोहीम राबवली जाते दरवर्षीच्या मानाने यावर्षी प्लास्टिक कचरा कमी प्रमाणात आढळून आला बरेचसे पर्यटन कचराकुंडीचा वापर करताना दिसून आले. तसेच काही पर्यटक स्वतःहून इतरांनी फेकून दिलेला कचरा कचरा कुंडीत मध्ये टाकताना आढळले.



गडावर कचऱ्याचे प्रमाण अत्यल्प आढळले पुणे दरवाज्यापासून घोड्याच्या पागेपर्यंत थोड्याफार प्रमाणात प्लास्टिक कचरा आढळून आला सर्वात जास्त कचरा अतकरवाडी मार्गे पुणे दरवाजा या गडवाटेवर सर्वात उंच शेवटच्या टप्प्यावर आढळून आला.

काही पर्यटक हे सोबतचा कचरा गडवाटेच्याकडे वरील उतारा फेकून देतात अशा उताराच्या ठिकाणावरून ट्रेकिंग पलटन चे सदस्यांनी मोठ्या प्रमाणात कचरा गोळा केला.

या मोहिमेत प्रदीप पाटील, संदीप चौधरी, अद्वैका चौधरी, श्रीरंग गोरसे, ज्ञानेश्वर पुरी, अक्षय खडके, भार्गव इरापल्ले रेड्डी, महेश केंद्रे, गणेश तांबे, गोकुळ लोंढे , ज्ञानेश्र्वर विळेकर, संदीप सातपुते, अक्षय मरासकोल्हे, अविनाश ठाकरे, सुधाकर कामडे, दीपक शेवाळे आणि डॉ सुरेश इसावे यांनी योगदान दिले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश