अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ येथे 22 मार्च जागतिक जल दिन उत्साहात साजरा



वडगाव मावळ (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) श्री. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ येथे 22 मार्च जागतिक जल दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रीन क्लबचे समन्वयक सहा प्रा. सोनाली पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सोबान आलम होते. त्यांनी आपल्या मनोगतात जल पातळीचे घटते प्रमाण व त्याचे दुष्परिणाम ग्लोबल वॉर्मिग बद्दल  माहिती दिली. कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी  महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे होत्या. त्यांनी जल संवर्धन काळाची गरज याबद्दल मार्गदर्शन केले,तसेच विद्यार्थ्यांना Why Waste Apps चा जास्तीत जास्त वापर करण्याबाबत आवाहन केले. तसेच प्राध्यापक मनोगतात सह समन्वयक सहा प्रा. ज्योती रणदिवे  यांनी हवामान बदल ऑनलाईन कोर्स करण्याबाबत सर्व विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. 


अध्यापक ग्रीन क्लबचे विद्यार्थी प्रतिनिधी दिपक पवार याने पाणी बचतीचे महत्त्व सांगून आजची पाणीबचत ही पुढच्या पिढ्यांसाठीची पाण्याची उपलब्धता आहे व आज आपण पाण्याचा अपव्यय  टाळायला हवा,या बद्दल मत व्यक्त केले. महाविद्यालयातील प्रथम वर्ष विद्यार्थिनींनी  ग्रीन क्लब भित्ती पत्रक प्रदर्शित करून पाणी बचत व हवामान बदलाबाबत उपस्थित सर्वांना जाणीव जागृती केली.


 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील विद्यार्थीनी शिल्पा गवळी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी कृष्णा भंडारी याने केले. कार्यक्रमास बी.एड महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थी आणि  प्रा. महादेव सांगळे, डॉ कविता तोटे, डॉ. संदीप गाडेकर,डॉ. शीतल देवळालकर,ग्रंथपाल सुजाता जाधव उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश