महाशिवरात्रीच्या पावन पर्वा निमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तर्फे बारा ज्योतिर्लिंग दर्शन चा भव्य देखावा

तळेगाव दाभाडे दि.9 (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) महाशिवरात्रीच्या पावन पर्वा निमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तर्फे बारा ज्योतिर्लिंग दर्शन चा भव्य देखावा केदारेश्वर मंदिर तळेगाव दाभाडे येथे करण्यात आला.

 कैलास पर्वतावर चैतन्य भगवंत शंकर योग तपस्या करताना पाहून भक्तगण प्रसन्न झाले. त्यानिमित्त परमात्मा शिव भगवान ने सांगितलेले महाशिवरात्रीचे रहस्य व महत्त्व आपल्या उगवत्या रसाळ वाणीतून केंद्राच्या संचालिका बीके प्रभा बहन यांनी विशद केले. तसेच जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून पत्रकार रेखा भेगडे, प्रसिद्ध निवेदिका विनया केसकर, प्रसिद्ध नृत्यांगना मीनल कुलकर्णी, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रमुख शैलाजा काळोखे. यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.

 तसेच संतोषजी खांडगे, श्रीमंत सरकार मासाहेब उमा राजे दाभाडे, याद्नसेनी राजे सत्येंद्र राजे दाभाडे यांचे विशेष उपस्थिती होती.

 महाशिवरात्रीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले होते. हरणेश्वर हॉस्पिटलचे डॉक्टरांचे टीम डॉक्टर कृतिका बारमुख, डॉक्टर कविता डाके फळकर डॉक्टर सिद्धी शहा. यांनी अनेक भक्तगणांची मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप केले. केतन बारमुख यांनी जबाबदारी पार पाडली.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश