धुळवडी निमित्ताने ट्रेकिंग पलटनची वाघेश्वर मंदिर येथे स्वच्छता अभियान राबवून हरित होळी साजरी


पवनानगर दि. 25 (संपादक -डॉ. संदीप गाडेकर) होळी आणि धुलीवंदन या सणाचे औचित्य साधून 25 मार्च 2024 रोजी ट्रेकिंग पलटनने वाघेश्वर मंदिर, शिळींब, पवना धरण येथे भेट देऊन हा परिसर प्लास्टिक मुक्त केला.



वाघेश्वर मंदिर हे पवना धरणाच्या जलाशयातील जलमग्न मंदिर आहे. जे धरणाच्या पाण्याची पातळी खालावलल्यानंतर साधारणतः उन्हाळ्यामध्ये दोन-तीन महिन्यासाठी खुले असते.  त्यामुळे  या मंदिराचे वेगळ्या आकर्षण आहे.  स्थानिक गावकऱ्यांनी मंदिर स्वच्छ आणि नेटके ठेवले आहे.  भेटी देणारे पर्यटक सोबत आणलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या,  पिंडीवर वाहण्यासाठी आणलेले दूध, पूजेसाठी आणलेल्या सामानाचा रिकाम्या पिशव्या, प्लास्टिकच्या स्नॅक्सची प्लास्टिकची पाकीट असा कचरा वाघेश्वर मंदिराच्या आजूबाजूला आणि धरणाच्या पाण्याकाठच्या प्रदेशात फेकून दिलेला कचरा ट्रेकिंग पलटन च्या सदस्यांनी. प्लास्टिक कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला.


 या मोहिमेमध्ये ट्रेकिंग पलटनच्या  श्रीरंग गोरसे, ज्ञानेश्वर पुरी, गोकुळ लोंढे, महेश केंद्रे, नामदेव हटवार, प्रतिक अडागळे, संदीप सातपुते, ज्ञानेश्वर विळेकर, अक्षय मरसकोल्हे, अविनाश ठाकरे, सुधाकर कामडे,  सनी गोयल, ऋषिकेश अग्रवाल, वरूण पेडणेकर आणि डॉ. सुरेश इसावे या सदस्यांनी योगदान दिले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश