महाशिवरात्रीला घरात आढळला भलामोठा नाग; सर्पमित्रांनी दिले जीवनदान


तळेगाव स्टेशन दि.8 (वार्ताहर)महाशिवरात्रीच्या दिवशी (शुक्रवार, दि. 8) पहाटे  तळेगाव स्टेशन येथे एका घरात नागाने दर्शन दिले. मात्र घरात आलेल्या नागाला सर्पमित्रांनी रेस्क्यू करत त्यास नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

प्रतिक नगर, तळेगाव स्टेशन निवृत्त पोलीस उपनिरीक्षक कविराज पाटोळे यांच्या घरात शुक्रवारी पहाटे पावणेचार वाजताच्या सुमारास नाग असल्याचे आढळले. हा नाग घरातील हॉलमध्ये टीपॉयवर वेटोळे घालून बसला होता. हॉलमध्ये झोपलेल्या महिलेला नागाच्या फुत्काराने जाग आली. त्यानंतर घरात भीतीचे वातावरण पसरले.

पाटोळे यांच्या शेजाऱ्यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे भास्कर माळी यांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर भास्कर माळी अवघ्या काही मिनिटांमध्ये पाटोळे यांच्या घरी आले. त्यावेळी नाग हॉलमध्ये असलेल्या देवघराच्या बाजूला बसला होता. त्यांनी सुरक्षितपणे नागाला रेस्क्यू केले.

सदैव वन्यजीव आणि नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असलेले वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि सभासद भास्कर माळी यांचे घरातील नागरिकांनी आभार  मानले

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश