पुणे, दि 10 (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी ही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी अविरतपणे लढणारी, 1962 पासून कार्यरत असणारी महाराष्ट्रातील सर्वात जुनी शिक्षक संघटना आहे. शिक्षकांच्या समस्या सोडवण्याबरोबरच शिक्षक तसेच समाजामध्ये शैक्षणिक विचारांची देवाण-घेवाण व्हावी, थोर महापुरुषांच्या शैक्षणिक विचारांची जाणीव जागृतीच्या उद्देशाने संघटनेच्या वतीने शैक्षणिक विचार मंथन या ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन 11 एप्रिल 2024 ते 14 एप्रिल 2024 या कालावधीत करण्यात आलेले आहे.
सदर व्याख्यानमाला ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपाची असून यामध्ये पुणे विभाग म्हणजेच पुणे, सातारा, सांगली ,सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. छत्रपती श्री. राजश्री शाहू महाराज,महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या शैक्षणिक विचारावर तसेच बदलत्या शैक्षणिक प्रक्रियेतील संघटनांची भूमिका यावर मान्यवरांचे विचार ऐकायला मिळणार आहेत.
टीडीएफ संघटनेच्या वतीने शैक्षणिक समस्या सोडवण्याबरोबरच अनेक विधायक उपक्रम राबवले जातात यापैकीच हा अतिशय स्तुत उपक्रम असून सर्वांनी या उपक्रमाचं कौतुक केले आहे.
सदर व्याख्यानमाला ही खुल्या स्वरूपाची असून सर्वांनी यात सहभागी व्हावे असे आव्हान महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष जी.के. थोरात यांनी केले आहे. सदर व्याख्यानमालेचे आयोजन पुणे विभागाच्या वतीने, विभागाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे,मा. सुरेश खोत, मुरलीधर मांजरे प्रा. सचिन दुर्गाडे, प्रा.शशिकांत शिंदे, प्रा. संतोष थोरात तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
संपादक - डॉ. संदीप गाडेकर
बातम्यांसाठी संपर्क -8208185037
Comments
Post a Comment