डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्यक्षात आचरणात आणून त्यांची जयंती साजरी व्हावी: प्रा. संतोष थोरात

पुणे, ता.14 एप्रिल, 2024

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या निमित्ताने, पुणे विभाग टीडीएफ, पुणे विभाग माध्यमिक शिक्षक संघ व शैक्षणिक व्यासपीठ पुणे आयोजित शैक्षणिक विचार मंथन ऑनलाइन व्याख्यान मालेचे चौथे पुष्प गुंफताना व्याख्याते प्रा.संतोष थोरात यांनी वरील विचार व्यक्त केले. 

यावेळी प्रा. संतोष थोरात यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन वृत्तांत उलगडून दाखवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक योगदान तसेच त्यांचे शिक्षण विषयक विचार व्यक्त केले. सर्व सामाजिक दुखण्यावर उच्च शिक्षण हे एकमेव औषध आहे असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते.विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून दलित,गोरगरीब,होतकरू, बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. आंबेडकरांनी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून शिक्षण विषयक विचारांना संविधानात्मक अधिष्ठान निर्माण करून दिले त्यामुळेच आजची ही शिक्षण व्यवस्था सक्षम झाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिक्षण हे समाज उन्नतीचे तसेच राष्ट्राच्या प्रगतीचे प्रवेशद्वार असल्यामुळे आजच्या काळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काही विधायक कार्य करून साजरी करण्यात यावी असे मत प्रा. संतोष थोरात यांनी व्यक्त केले.

यावेळी संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 एकूणच चार दिवस चाललेल्या या ऑनलाइन व्याख्यानमालेची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी त्यांचे शैक्षणिक विचार व योगदानावर व्याख्यान देऊन करण्यात आली.

महात्मा फुले जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या निमित्ताने चालवलेल्या या व्याख्यानमालेत अनेक वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. यामध्ये प्रामुख्याने, सौ. हर्षा पिसाळ, जी.के. थोरात, विजयराव कचरे, के. एस. ढोमसे व राजेश वरक यांच्या व्याख्यानांचा समावेश होता. सर्वच वक्त्यांनी या व्याख्यानमालेमध्ये बहुमोल असे मार्गदर्शन केले.

या व्याख्यानमालेमध्ये पुणे,सातारा ,सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षक, पालक व विद्यार्थी सहभागी झाले होते. या ऑनलाइन शैक्षणिक विचार मंथन व्याख्यानमालेचे यशस्वीपणे, नियोजनबद्ध आयोजन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष जी.के. थोरात सर त्याचप्रमाणे सचिव हिरालाल पगडाल सर यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून आयोजकांचे अभिनंदन केले.

आजच्या या व्याख्यानमालेचे प्रास्ताविक पुणे विभाग माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुरेश खोत सर यांनी केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.भारती राऊत  यांनी केले तर  सर्वांचे आभार पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्राचार्य राज मुजावर यांनी मानले.

सदर शैक्षणिक विचार मंथन ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन नियोजन पुणे विभाग टीडीएफ चे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभाग माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव प्रा. सचिन दुर्गाडे, पुणे शहर जुनि. कॉलेज टीडीएफ चे अध्यक्ष प्रा. शशिकांत शिंदे सर , पुणे शहर टीडीएफचे अध्यक्ष प्रा.संतोष थोरात, टिडीएफ चे पुणे शहर सोशल मिडिया प्रमुख संतराम इंदोरे, महिला टीडीएफच्या अध्यक्षा सौ. हर्षा पिसाळ, पुणे शहर महिला माध्यमिक शिक्षिका संघाच्या अध्यक्षा सौ.भारती राऊत, संघाच्या सचिव डॉ. मंगल ताई शिंदे यांनी केले होते.

सदर ऑनलाईन व्याख्यानमाला यशस्वी करण्यामध्ये पुणे विभाग टीडीएफ चे सचिव मुरलीधर मांजरे सर, माध्यमिक शिक्षक संघाचे पुणे विभागाचे अध्यक्ष, सुरेश खोत, उपाध्यक्ष सांगलीचे अरुण सावंत सर,सातारा जिल्हा ,टीडीएफ चे अध्यक्ष यशवंतराव गायकवाड सर, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले सर, महिला अध्यक्षा स्वाती उपार मॅडम, माध्यमिक शिक्षक संघाचे पुणे जिल्ह्याचे कार्यवाह पंकज घोलप सर, उपाध्यक्ष रेश्मा यादव, कल्पना कोल्हे तसेच पुणे शहर, जिल्हा टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश