घोटकुलेवाडी खुर्द शाळा झाली डिजीटल


तळेगाव दाभाडे दि.७ 

(संपादक - डॉ.संदीप गाडेकर)

फिडेल सोफ्टेक (Fidel Softech) यांच्या सामाजिक दायित्व निधी आणि थिंकशार्प फौंडेशनच्या माध्यमातून मावळ (जि- पुणे) तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा घोटकुलेवाडी खुर्द या शाळेत डिजिटल क्लास, ग्रंथालय आणि शाळेच्या नूतनीकरणाचे उद्घाटन  मान्यवरांच्या हस्ते पार पाडण्यात आले तसेच वृक्षारोपण देखील करण्यात आले . याप्रसंगी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शाळा हरित करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी  प्रमुख पाहुणे  म्हणून फिडेल सोफ्टेक कंपनीच्या संचालिका श्रीमती. प्राची कुलकर्णी तसेच थिंकशार्प फाऊंडेशन चे  संस्थापक मा.श्री संतोष फड तसेच मावळ शिक्षण विभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम शोभा वहिले,बौर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री झंपू ताते,आढले केंद्राचे केंद्रप्रमुख विजय  मारणे व  उद्योजक परितोष दास आणि इतर सर्व शाळांचे मुख्याध्यापक गावचे सरपंच सौ नंदा भालेसन, उपसरपंच सौ मंदाताई घोटकुले तसेच ग्रामपंचायत सदस्य पप्पूशेठ चांदेकर सौ पशाले व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल पशाले व गावातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. 


याप्रसंगी  बोलताना  फिडेल सॉफ्टेक च्या संचालिका प्राची कुलकर्णी यांनी कंपनीच्या  कार्याबद्दल  उपस्थित सर्वाँना माहिती दिली तसेच फिडेल सोफ्टेक च्या सामजिक दायित्व निधीच्या माध्यमातून भविष्यात अजूनही अशाप्रकारची मदत करता येईल याबाबत सकारात्मकता दाखवली.  बदलत्या काळानुसार माहिती तंत्रज्ञानात झालेल्या डिजिटल क्रांतीने सारे जग एकत्र आले आहे. तंत्रज्ञानाची ओळख जर शालेय जीवनातच विध्यार्थ्यांना झाली तर प्रगत तंत्रज्ञानाबरोबर प्रगती करण्याची संधी त्यांना मिळेल तसेच विद्यार्थ्यांमध्ये आधुनिकतेची आव्हाने पेलण्याची क्षमता विकसित होईल असे मत श्रीमती शोभा वहिले यांनी मांडले.

हे ओळखून थिंकशार्प फौंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबवला जात आहे. सदर डिजिटल क्लास मध्ये देण्यात आलेल्या टीव्ही मध्ये वेगवेगळे अँप्लिकेशन आणि सॉफ्टवेअर वापरून ऍडव्हान्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना शिकवलं जाऊ शकते तसेच यामध्ये शाळेचा संपूर्ण अभ्यासक्रम ऑफलाईन दिलेला आहे याच्या वापराचे संपूर्ण प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी याचा पूर्णपणे वापर करू शकतात. त्याचप्रमाणे ग्रंथालयातील आकर्षक पुस्तकांचा वाचन वाढीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नक्कीच फायदा होईल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक .श्री  राजू लोंढे यांनी केले व सूत्रसंचालन गुलाब दाभाडे व राहुल जाधव यांनी केले आभार  श्री. कैलास जगताप यांनी केले

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश