प्रा. संतोष थोरात व सौ.भारती राऊत यांना स्व. मा.आमदार शिवाजीराव पाटील जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

पुणे,ता.7 मे 24

विमाननगर मधील आनंद विद्यानिकेतन हायस्कूल मधील  विद्यार्थीप्रिय, अष्टपैलू,इंग्रजी विषयाचे शिक्षक प्रा.संतोष थोरात यांना तसेच गॅरीसन  चिल्ड्रन हायस्कूल खडकी येथील अष्टपैलू शिक्षिका सौ. भारती राऊत यांना नुकताच स्व. माजी आमदार शिवाजीराव पाटील जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

दरवर्षी 9 जून रोजी या पुरस्काराचे वितरण होते. टीडीएफ चे आमदार शिवाजीदादा पाटील यांच्या स्मृतिपित्यर्थ हे  पुरस्कार जिल्हा टीडीएफ व जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित केले जातात.

     प्रा. संतोष थोरात हे गेली 20 ते 22 वर्ष शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असून विद्यार्थी व शाळेच्या प्रगतीसाठी नेहमीच ते  नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात तसेच ते इंग्रजीचे लेखकव, पत्रकार असून व्याख्याते सुद्धा आहेत. आतापर्यंत त्यांची तीन इंग्रजीची पुस्तके प्रसिद्ध झाली असून अनेक सामाजिक व शैक्षणिक विषयावर त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत.

सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पीएच.डी. चे संशोधन करीत आहेत तसेच पुणे शहर टीडीएफ घ्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत असून शिक्षक चळवळीमध्ये कार्यरत आहेत. त्यांना अनेक शैक्षणिक व सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

सौ. भारती राऊत या सुद्धा आदर्श शिक्षिका, उत्कृष्ट निवेदिका असून गेली वीस वर्ष शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सध्या त्या पुणे शहर महिला माध्यमिक शिक्षका संघाच्या अध्यक्षा असून त्यांनी महिला शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हिर-हिरने भाग घेतला आहे. शाळेत त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून परिचित असून विद्यार्थ्यांसाठी अनेक नवनवीन उपक्रम नेहमी राबवत असतात.

सदर पुरस्कार जाहीर झाल्यामुळे दोघांच्यावर  पुणे शहर व जिल्ह्यातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सदर पुरस्कार वितरण हे रविवार दि. 9 जून रोजी राजगुरुनगर येथे महाराष्ट्र राज्य टीडीएफ चे अध्यक्ष मा. आमदार नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष जी.के. थोरात, खेडचे आमदार दिलीपरावजी मोहिते पाटील, मा. आमदार  ऍड. राम कांडगे, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. निर्मलाताई पानसरे, पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे  शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, विश्वस्त के. एस. ढोमसे, पुणे विभाग अध्यक्ष शिवाजीराव कामथे, माध्यमिकचे सचिव सचिन दुर्गाडे, जिल्हाध्यक्ष वसंतराव ताकवले. मुरलीधर मांजरे जिल्हा कार्यवाह पंकज घोलप यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश