नॅक मूल्यांकनात एमआयटी संत ज्ञानेश्वर बी. एड. महाविद्यालय महाराष्ट्रात अव्वल

 

आळंदीः दि. १२ (प्रतिनिधी) येथील माईर्स, एम आय टी संत ज्ञानेश्वर बीड कॉलेजला नॅक समितीकडून “ ए “हे मानांकन ३.१० CGPA ने प्राप्त झाले. यासोबतच 2023 -24 या शैक्षणिक वर्षासाठी महाविद्यालयाने अध्यापक महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील सर्वोच्च संस्था म्हणून स्थान मिळवलेले आहे . दि. 28 व 29 मे रोजी बंगळूर येथील राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषद ( नॅक) समितीतर्फे महाविद्यालयाची पाहणी करण्यात आली . दोन दिवस या समितीने महाविद्यालयातील सर्व विभागांचे शैक्षणिक उपक्रम , भौतिक सोयी सुविधा , नवीन उपक्रम , विद्यार्थी शिक्षकांची प्रगती , प्रशासकीय बाबी  तसेच विद्यार्थी , पालक व माजी विद्यार्थी यांच्याशी संवाद अशा अनेक गोष्टींची पाहणी केली तसेच प्राध्यापकांसाठी सर्व गुणसंपन्न असा शेरा त्यांनी दिला . सदर नॅक समितीचे अध्यक्ष प्रा. तिरुमलाई कुमार एस.  नॅक समन्वयक प्राध्यापक रेणु नंदा व सदस्य डॉ.अभय कुमार परमार हे होते. महाविद्यालयाचे विविध कार्यक्रम आणि उपक्रमांमध्ये सर्व समावेशकता असून आणि समाजाच्या कल्याणासाठी विद्यार्थी आणि शिक्षक प्रयत्न करतात . प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देण्याबरोबर विविध विषयांवर कार्यशाळा आणि चर्चासत्र आयोजित करण्यासाठी सतत प्रयत्न कार्यरत असतात . महाविद्यालयाने आपली उत्कृष्टतेची परंपरा कायम ठेवण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षक शिक्षण नवोपक्रम , अध्यापन पद्धती , एज्युकेशन 4.0 टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 21 व्या शतकात भारताला विश्वगुरू बनविण्याच्या दृष्टीने महाविद्यालयाची वाटचाल सुरू आहे . महाविद्यालयातील शिक्षक शैक्षणिक संशोधन आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून ज्ञानेश्वरी व अध्यात्माच्या शिक्षणातून मूल्याधिष्ठित समाज घडविण्याचे कार्य करीत आहेत या सर्व उपक्रमांमुळे आज महाविद्यालय यशाची विविध शिखरे पादक्रांत करीत आहे . यामुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड , अध्यक्ष श्री. राहुल कराड , महासचिव प्रा. स्वाती कराड - चाटे  तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी प्राचार्य डॅा. सुरेंद्र हेरकळ व सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी शिक्षकांचे कौतुक केले आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश