बंधुता गुणवंत शिक्षक पुरस्काराने प्रा. राजेंद्र श्रीमंत आठवले व प्रा.विजय खेडकर सन्मानित


तळेगाव स्टेशन दि. 10 (वार्ताहर)
इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे येथील प्रा. राजेंद्र श्रीमंत आठवले व प्रा.विजय खेडकर यांना बंधुता गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
          बंधुता लोकचळवळीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विश्वबंधुता साहित्य परिषद आणि भारतीय जैन संघटनेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वाघोली, पुणे या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक पहिले विश्वबंधुता विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन  क्रांती दिनाच्या दिवशी शुक्रवार, दि. ९ ऑगस्ट २०२४  पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
         सदर पुरस्कार संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सविता पाटील स्वागताध्यक्ष मा. सुरेश बापूू साळुंखे, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, विलास राठोड, प्रा. शंकर  आथरे  शिक्षक,  विद्यार्थी, नागरिक यांच्या उपस्थितीत व बंधुताचार्य प्रकाश  रोकडे यांच्या हस्ते बंधुता गुणवंत शिक्षक पुरस्कार  प्रा. राजेंद्र श्रीमंत आठवले व प्रा.विजय खेडकर यांना देण्यात आला.
             विद्यादानाचे पवित्र कार्य करीत असतांना विद्यार्थ्याच्या कला गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी सातत्याने विविध प्रकारचे कार्यक्रम आणि उपक्रम राबवीत आहात ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. आपल्या या राष्ट्रहीताच्या कार्याचा उचित असा सन्मान म्हणून प्रा. राजेंद्र श्रीमंत आठवले व प्रा.विजय खेडकर यांना विश्वबंधुता साहित्य परिषदेच्यावतीने अतिशय प्रतिष्ठेचा असा 'बंधुता गुणवंत शिक्षक पुरस्कार' प्रदान  करण्यात आला. ह्या पुरस्काराबाबत मावळ तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव असा होत आहे.

जाहिरात व बातमीसाठी संपर्क 
डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो. 8208185037

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश