पुणे : दि. १४ (प्रतिनिधी) अविष्कार फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने नुकताच अण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे या ठिकाणी ज्ञानज्योती पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ यांना २०२४ चा गुरुमाऊली सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. सुरेंद्र हेरकळ हे आळंदी येथील एम आय टी संत ज्ञानेश्वर बी. एड. कॉलेजचे प्राचार्य आहेत. मागील २० वर्षापासून शिक्षण क्षेत्रात ते कार्यरत आहेत. त्यांची ११ पुस्तके प्रकाशित झाले असून ५२ पेक्षा जास्त शोधनिबंध हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेले आहेत. राष्ट्रीय मूल्यांकन एवं प्रत्यायन परिषद (NAAC) मूल्यांकनामध्ये पहिल्याच फेरीत ‘ अ ’ श्रेणी प्राप्त केली आहे. अनेक विद्यापीठात ते विविध समितीवर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांना २१ पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. डॉ.हेरकळ यांनी विविध विषयात १२ पदव्या प्राप्त केलेले आहेत.
डॉ. सुरेंद्र हेरकळ हे मागील तीन वर्षापासून नियमित भजन साधना करीत आहेत त्याचबरोबर हडपसर येथील एकमुखी दत्त मंदिरात मुलांसाठी हरिपाठ घेतात. यावर्षी त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत आषाढी पायीवारी माऊलींच्या कृपाशीर्वादाने प्रचितीसह पूर्ण केली. या त्यांच्या शैक्षणिक आणि अध्यात्मिक सेवेबाबत अविष्कार फाउंडेशन, कोल्हापूर यांनी त्यांचा गौरव राज्यस्तरीय गुरुमाऊली सेवा पुरस्काराने केलेला आहे. या पुरस्काराने मला प्रेरणा मिळाली असून यामुळे मी ज्ञानेश्वर माऊलींची अधिक सेवा करण्यासाठी बांधील झालो असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
बातमी व जाहिरात संपर्क
डॉ. संदीप गाडेकर
संपादक
मोबाईल नंबर 820 818 50 37
Comments
Post a Comment