सुरेश नामदेव निंगुळे यांना पीएच.डी. पदवी प्रदान



श्री. सुरेश नामदेव निंगुळे यांना 1 ऑगस्ट 2024 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. श्री. सुरेश नामदेव निंगुळे हे सध्या प्रादेशिक व्यवसाय व्यवस्थापक म्हणून खाजगी कंपनी मध्ये पुणे येथे कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाणिज्य व व्यवसाय विभागातील मानव संसाधन व्यवस्थापन यामध्ये डॉ. सुरेश नामदेव निंगुळे यांनी "पुणे प्रदेशातील श्वसन औषधांच्या संदर्भात औषध उद्योगाच्या विपणन पद्धतींचे सखोल विश्लेषण" ( Marketing Practices of the Pharmaceutical Industry Concerning Respiratory Medicine) हा संशोधन प्रबंध विद्यापीठाला सादर केला. यासाठी डॉ. सचिन बोरगावे, डायरेक्टर, प्रतिभा इन्स्टिटयूट ऑफ बिजनस मॅनेजमेंट, पुणे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल डॉ. सुरेश यांचे मोठे बंधू श्री. मधुकर निंगुळे, श्री. भारत निंगुळे, छोटी बहीण सौ. अनुराधा भास्कर लांडगे व सर्व सहकारी यांनी सन्मान करून अभिनंदन केले आहे.  त्यांच्या या यशाबद्दल पुणे परिसर व त्यांचे मुळ गाव चिंचोली (माळी), ता- केज, जिल्हा- बीड गावातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


त्यांच्या या यशामध्ये त्यांच्या पत्नी डॉ. सुरेखा सुरेश निंगुळे, मुलगा स्वरीत निंगुळे, देवांश निंगुळे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या पत्नी डॉ. सुरेखा सुरेश निंगुळे यांना सुद्धा काही दिवसापूर्वी पीएच.डी पदवी प्रदान झालेली आहे.

जाहिरात व बातमीसाठी संपर्क
डॉ.संदीप गाडेकर
8208185037

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश