व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये शिक्षकदिन उत्साहात साजरा


 लोणावळा दि.५ (प्रतिनिधी) येथील व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये दि.05/09/2024 रोजी शिक्षकदिन साजरा करण्यात आला. संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे व कार्यवाहक डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाहक श्री.विजय भुरके, गव्हर्निंग कौन्सिलचे मेंबर श्री.भगवान आंबेकर,ॲड. संदीप अगरवाल व श्री.नितीन गरवारे, श्री.स्वप्नील गवळी, महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर यांच्या प्रेरणेने महाविद्यालयात शिक्षकदिन साजरा करण्यात आला.

                     तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व सांस्कृतिक विभागप्रमुख नेहा शाह यांनी देखील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .सर्वप्रथम दीपप्रज्वलन , सरस्वतीपूजन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.तसेच तिसऱ्या वर्षातील  विद्यार्थ्यांनी, महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. हरीश हरसुरकर , प्रो. हुसेन शेख, प्रो.सोनी राघो , प्रो.प्रीती चोरडे यांना फोटोफ्रेम देऊन सन्मानित केले.त्यानंतर सर्व शिक्षकांसाठी विविध गेम्स आयोजित केल्या व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाविषयी माहिती व शिक्षकदिन का साजरा केला जातो याबददल माहिती सांगितली. सांस्कृतिक विभागप्रमुख नेहा शाह यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.अशा रितीने महाविद्यालयात शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


जाहिरात व बातमीसाठी संपर्क 
डॉ. संदीप गाडेकर 
संपादक 

मोबाईल नंबर 820 818 50 37

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश