टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात विकसित भारत व माय भारत पोर्टल ची माहिती मंत्री रक्षा खडसे देणार - कृष्णकुमार गोयल


पुणे दि.15 (प्रतिनिधी) खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडकी येथे 20 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी तीन वाजता  टी जे कॉलेज मध्ये माय भारत पोर्टल व विकसित भारत विषयी माहिती केंद्रीय मंत्री देणार असल्याची माहिती खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी दिली. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या विकसित भारत आणि माय भारत पोर्टल च्या सेवा सुविधा ची माहिती प्रत्यक्ष देण्यासाठी तसेच माय भारत पोर्टल चे फायदे आणि विकसित भारत ट्रान्सफॉर्मिंग रेल कनेक्टिव्हिटी, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक लीडरशिप, ॲडव्हान्सिंग डिजिटल लिटरसी, बुष्टिंग स्पोर्ट टॅलेंट, प्रमोटिंग टुरिझम, लीडिंग इन एज्युकेशन, अशा भारत सरकारच्या विविध विकासात्मक धोरणांची व  योजनांची माहिती क्रीडा व युवक कल्याण  भारत सरकार च्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे देणार आहेत. यावेळी खडकी शिक्षण संस्थेचे सचिव माननीय आनंद छाजेड,प्राचार्य डॉ. संजय चाकणे, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र लेले, राष्ट्रीय सेवा योजना  कार्यक्रम अधिकारी डॉ.  निलेश काळे उपस्थित होते. 

   या कार्यक्रमास शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे,  भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष  राजेश पांडे, खडकी कंटोनमेंट बोर्डाच उपाध्यक्ष नगरसेवक दुर्योधन भापकर, तसेच खडकी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, खडकी शिक्षण संस्थेतील वेगवेगळ्या विभागातील कार्यरत शाखांचे प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. माय भारत पोर्टलला टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कामकाज सुरू झालेले आहे त्यामुळे महाविद्यालयाला ही संधी मिळालेली आहे. असे मत नेहरू युवा केंद्र चे संचालक मा आशिष शेटे यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या कालावधीत माय भारत पोर्टल व विकसित भारतची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवण्याचा खडकी शिक्षण संस्थेचा मानस आहे असे मत प्राचार्य संजय चाकणे यांनी व्यक्त केले.


जाहिरात आणि बातमीसाठी संपर्क 

डॉ. संदीप गाडेकर 

संपादक
मोबाईल 820 818 50 37


Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश