मावळात शिक्षकांसाठी बाल संरक्षण परिषदेचे आयोजन

 


 वडगाव मावळ दि. 19 (प्रतिनिधी) जिल्हा विधी प्राधिकरण पुणे,पंचायत समिती मावळ,होप फॉर चिल्ड्रेन फाउंडेशन, पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे, व गेस्टटॅप कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षकांसाठी बाल संरक्षण परिषद प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.


          या प्रशिक्षण कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती मावळ शिक्षण विभागाच्या शि. वि. अधिकारी शोभा वहिले मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पुढे परिषदेतील प्रमुख तज्ञ मार्गदर्शक सचिन पाटील यांनी बाल संरक्षण कायदा (pocso )अंतर्गत येणाऱ्या बाबींचा सविस्तर उलगडा केला. त्यांनी बालकांचे अधिकार,बालकांचे संरक्षणाविषयी शिक्षकांची भूमिका तसेच बाल संरक्षण कायद्याची वैशिष्ट्ये, या कायद्याचे स्वरूप, कायद्यामध्ये येणारे विविध कलम आणि त्या कलमा अंतर्गत येणाऱ्या शिक्षा चे स्वरूप , तसेच हा गुन्हा कशाप्रकारे घडला जाऊ शकतो  , तसेच या संरक्षण कायद्यामध्ये शिक्षकाची भूमिका व पालकांची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.


            पुढे परिषदेस उपस्थित मान्यवरांपैकी  वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम साहेब, भरोसा सेलच्या पोलीस अधिकारी  अनुराधा पाटील मॅडम, डॉक्टर कॅरोलीन मॅडम  आणि वडगाव मावळ न्यायालयाचे न्यायाधीश यांनी देखील उपस्थित सर्व शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले.



         याप्रसंगी व्यासपीठावर  वडगांव मावळ न्यायालयाचे न्यायाधीश अनसुले साहेब , डॉक्टर कॅरोलिन मॅडम, वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक कुमार कदम, भरोसा सेलच्या पोलीस अधिकारी अनुराधा पाटील, वडगाव पंचायत समितीच्या वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वहिले मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी काळे मॅडम, संत तुकाराम अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य व सर्व शिक्षक उपस्थित होते.

      सदरील बाल संरक्षण परिषदेचे संपूर्ण नियोजन हे केंद्रप्रमुख दहीतुले मॅडम, विषय साधनव्यक्ती शकीला शेख व साधना काळे मॅडम यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश