तळेगाव स्टेशन (प्रतिनिधी) दि. ४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वा. छत्रपती शिवाजी चौक, तळेगाव दाभाडे स्टेशन या ठिकाणी प्रविणकुमार हुलावळे व बंधू प्रदिप व जयसिंग हुलावळे यांनी सुरू केलेल्या हॅटसन ॲग्रो अरुण आईसक्रीम च्या आऊटलेटचे उद्घाटन हुलावळे बंधूंचे आई-वडिल व तळेगाव नगरपरिषदेचे मा. नगरसेवक, बांधकाम व्यावसायिक श्री . सचिनदादा टकले , शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त वेटलिफ्टर श्री . नितीनजी म्हाळसकर, निवृत्त पोलिस निरिक्षक कविराज पाटोळे यांच्या शुभहस्ते व जेष्ठ फुलोत्पादन तज्ञ श्री . अविनाश जी दांडेकर, कृषि पंढरी उद्योगसमुह चे मालक श्री . नितिन जी जगताप , गोविंद ग्रीनहाऊस चे मालक श्री . बाळासाहेब गाडेकर, कृषी अधिकारी पिरजादे साहेब, किनारा ढाबा मालक निवृत्त पोलिस अधिकारी राजेंद्र साळुंखे, हॅटसन ॲग्रो अरुण आईसक्रीम चे अधिकारी गौरव सिंघ (ZSM ), सुरेश जे . ( RSM ), द्रविड मनी ( RSM ), पुरुषोत्तम बी (RSM ), अरुण आईसक्रीम चे BDM , RDM , BDE , FDE, या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीतीत संपन्न झाले. याप्रसंगी परिसरातील नागरिक बंधू भगिनी व मित्रपरिवार उपस्थित होते.
सचिन टकले यांनी हुलावळे बंधूंचे अभिनंदन करताना सांगितले की मराठी तरुण व्यवसायात उतरुन भरारी घेताना मनस्वी आनंद होत आहे. त्यांच्या यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देताना तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता विविध व्यावसायिक संधी शोधल्या पाहिजेत असे आवाहन मराठी तरुणांना केले. उपस्थितांचे स्वागत फुलोत्पादक जयसिंग हुलावळे यांनी केले व आभार प्रविणकुमार हुलावळे यांनी मानले.
या आउटलेट च्या शुभारंभ यानिमित्ताने दि. ४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर पर्यंत दररोज वेगवेगळ्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत त्यांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
जाहिरात व बातमीसाठी संपर्क
डॉ. संदीप गाडेकर
संपादक
मोबाईल नंबर 820 818 50 37
Comments
Post a Comment