पुणे,दि. 4 (प्रतिनिधी) आपटे प्रशालेमध्ये विद्यार्थिनी सुरक्षा व्याख्यानमालेचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. गिरिषा निंबाळकर यांनी विद्यार्थिनींना पॉक्सो कायदा, समाज माध्यमांचा वापर कसा करावा, तसेच स्वतःचे संरक्षण कसे करावे, तक्रार कोणाकडे करावी, अनोळखी व्यक्तींशी कसे वागावे या संदर्भात मार्गदर्शन केले व स्वतःचा फोन नंबर मुलींना संपर्क करण्यासाठी दिला. आपटे प्रशालेच्या दामिनी मार्शल पोलीस कॉन्स्टेबल संगीता खवळे यांनी सुरक्षिततेसंदर्भातील नियम सांगितले.
लक्ष्मणराव आपटे प्रशालेच्या प्राचार्य माननीय मेधा सिन्नरकर यांनी प्रास्ताविकातून मुलींना मनोबल कायम उंच ठेवण्याचा सल्ला दिला. शिक्षक लोकशाही आघाडी पुणे विभागाचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव कामथे यांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शाळा कोणकोणत्या गोष्टी करते हे सांगितले व मुले व मुलींनी कोणती काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.
स्वागत आणि सूत्रसंचालन हर्षा पिसाळ यांनी केले. पाहुण्यांची ओळख टीडीएफ महिला आघाडी पुणे शहर च्या कार्याध्यक्ष कल्पना कोल्हे यांनी सांगितली. आभार माननीय पर्यवेक्षक गौतम मगरे यांनी मानले. फलक लेखन व कार्यक्रम पत्रिका माधवी एलारपूरकर यांनी केली. सजावट आरती राजेभोसले यांनी केली. टीडीएफ राज्याचे समन्वयक माननीय संजीव यादव सर ,सखी सावित्री मंचाच्या महिला प्रतिनिधी व टीडीएफ महिला आघाडीच्या सहसचिव श्रीमती कविता शिंदे व टीडीएफ महिला आघाडीच्या पदाधिकारी वैशाली सोनवणे भगवान पांडेकर, द्वारकानाथ दहिफळे याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन महिला TDF पुणे शहर च्या अध्यक्ष हर्षा पिसाळ यांनी प्राचार्य मेधा सिन्नरकर, पर्यवेक्षक माननीय गौतम मगरे , प्राचार्य शिवाजीराव कामथे, टीडीएफ पुणे शहर अध्यक्ष संतोष थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
जाहिरात व बातमीसाठी संपर्क
डॉ. संदीप गाडेकर
संपादक
मोबाईल नंबर 820 818 50 37
Nice
ReplyDelete