पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी व माध्यमिक शिक्षक संघाचे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

 



पुणे, दि.4 सप्टें.

पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी व माध्यमिक शिक्षक संघाचे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून पुरस्कारांचे वितरण दि. 14 सप्टेंबर 2024 रोजी मान्यवरांच्या   उपस्थितीत पुणे मनपाचे सावित्रीबाई फुले सभागृह भवानी पेठ, पुणे येथे होणार आहे असे पुणे शहर टीडीएफ चे अध्यक्ष प्रा. संतोष थोरात व माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्राचार्य राज मुजावर यांनी कळवले आहे.


पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिले जाणारे गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर पुरस्कार जाहीर झाले आहेत. संघटनेच्या वतीने दरवर्षी या पुरस्कारांचे आयोजन नियोजन केले जाते. पुणे शहरामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची या पुरस्कारांसाठी निवड केली जाते.
यामध्ये प्रामुख्याने खालील पुरस्कारांचा समावेश आहे.

जीवनगौरव पुरस्कार-1
विशेष पुरस्कार-3
गुणवंत मुख्याध्यापक-06
ज्युनिअर कॉलेज प्रा.-05
शिक्षक/ शिक्षिका-38
शिक्षकेतर-02
एकूण 55 पुरस्कारांचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश