मावळातील प्राथमिक शिक्षकांकडून लोहगड किल्ल्याची स्वच्छता मोहीम


तळेगांव दाभाडे दि. 24 (प्रतिनिधी) स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत गड किल्ले संवर्धन व स्वच्छता तसेच युनोस्कोने नामांकन केलेल्या लोहगड किल्ल्याची स्वच्छता मोहीम या उपक्रमांतर्गत पंचायत समिती मावळ  शिक्षण विभाग यांच्यावतीने  फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाडे, मावळ शिक्षक प्रबोधन परिवार व हिरकणी शिक्षिका मैत्रीण ट्रेकिंग ग्रुप यांनी मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी लोहगड गाव व किल्ला परिसर याची संपूर्ण स्वच्छता केली. सदर स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व माननीय गटविकास अधिकारी सुधीर भागवत, माननीय गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, शिक्षण विस्ताराधिकारी शोभा वहिले, केंद्रप्रमुख निर्मला काळे, सुनंदा दहीतुले, सुहास धस, सहदेव डोंबे, राजू भेगडे, मनोज भांगरे, संदीप कांबळे,तानाजी शिंदे, सुरेश पाटील, संतोष राणे, गोरक्ष जांभुळकर,शिवाजी जरग, स्मिता कांबळेआदी सुमारे 80 शिक्षकांनी केले. 



युनेस्कोने नामांकन केलेल्या पुणे जिल्ह्यातील तीन किल्ल्यांपैकी लोहगड हा एक किल्ला आहे. तसेच अनेक पर्यटकांचे आकर्षण नाचा केंद्रबिंदू आहे. अभेद्य  तटबंदी असलेला आणि दैदीप्यमान इतिहास असलेला हा लोहगड किल्ला मावळ तालुक्याची शान आहे. 



या किल्ल्याला जागतिक वारसा मिळवून देण्यासाठी फ्रेंड्स ग्रुप हिरकणी ग्रुप आणि मावळ शिक्षक प्रबोधन परिवार यांच्यामार्फत स्वच्छता मोहिमेत खारीचा वाटा उचलला. मावळ तालुक्यातील सुमारे 70 शिक्षकांनी सदर मोहिमेत भाग घेतला. लोहगड किल्ल्यावर शिवव्याख्याते सचिन ढोबळे यांचे व्याख्यान झाले. सूत्रसंचालन सुहास धस यांनी केले. उपस्थितांचे आभार राजू भेगडे आणि मनोज भांगरे यांनी मानले.


जाहिरात व बातमीसाठी संपर्क 
डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.820 818 50 37

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश