लोणावळा दि.५ (प्रतिनिधी) महाविद्यालयास आपला योग्य दर्जा सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद म्हणजे नॅक समितीमार्फत मूल्यांकन होणे आवश्यक असते. महाविद्यालयास मानांकन प्राप्त झाल्यास सदर महाविद्यालयाची विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता वाढवून प्रदेशात एक चांगल्या विद्यापीठाची संबंध जोडण्याची शक्यता वाढते तसेच कॅम्पस मध्ये येणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढते त्यामुळे विद्यार्थ्यांचे उपलब्ध करिअरच्या संधीची विविधता वाढते. या उद्देशाने नॅक मूल्यांकनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या टेक्निकल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत श्रीमती काशीबाई नवले शिक्षण शास्त्र महाविद्यालय लोणावळा या महाविद्यालयाने अर्ज दाखल केला होता. यावेळी नॅक मूल्यांकन तज्ञ समितीकडून महाविद्यालयाची पाहणी करण्यात आली होती. या महाविद्यालयातील उत्कृष्ट शिक्षण प्रणाली उच्चशिक्षित व शिस्तप्रिय अनुभवी प्राध्यापक नामवंत महाविद्यालयात होत असलेले विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट‚ स्वच्छ इमारती व महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थीना खेळांसाठी लागणारे अद्यावत मैदाने, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा विद्यापीठातील उत्कृष्ट निकाल, आरोग्य व त्यांचे प्रकाशन, विविध सामाजिक क्षेत्रातील संस्थेची कामगिरी तसेच ग्रीन कॅम्पस अवार्ड अशा निष्कर्षावर महाविद्यालयाची गुणवत्ता समितीने दिनांक 29 व 30 ऑगस्ट 2024 रोजी पाहणी व तपासणी केली होती. या अंतर्गत सदर महाविद्यालयास नॅक (B++) राष्ट्रीय मूल मूल्यांकन प्राप्त झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.बी.देसाई यांनी दिली. श्रीमती काशीबाई नवले शिक्षण शास्त्र महाविद्यालय या यशामध्ये महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहभाग असल्याचे प्राचार्यांनी माहिती सांगितली दिली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रो.एम. एन. नवले सर, सचिव डॉ.(सौ.) सुनंदा नवले मॅडम, उपाध्यक्ष डॉ. रोहित एम. नवले सर, उपाध्यक्षा डॉ. रचना नवले-अष्टेकर मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. संस्थेच्या लोणावळा कॅम्पसचे संचालक डॉ. एम. एस. गायकवाड. तसेच एस. के. एन. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉ. एम. एस. रोहकले, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉ. एस. डी. बाबर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. रुकसाना पिंजारी , सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ.अंजली चॅटरटॉऩ निवृत्ती बाबाजी नवले कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. ढोले, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट ऍडमिनिस्ट्रेशन अँड कॅम्पुटर एप्लीकेशनच्या संचालिका डॉ. विद्या नखाते, सिंहगड पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. एन. के. मिश्रा याचे मार्गदर्शन लाभले. सगळ्यांकडून महाविद्यालयाचे कौतुक होत आहे.
जाहिरात व बातमीसाठी संपर्क
डॉ. संदीप गाडेकर
संपादक
मोबाईल नंबर 820 818 50 37
Comments
Post a Comment