"विद्यार्थ्यांनो काहीही करा,काय वाटेल ते करा,पण जे करणार ते अतिशय उत्तम असले पाहिजे" डॉ . संजय चाकणे


पुणे दि. 14 (प्रतिनिधी) जे जे उत्तम उदातत्त उन्नत ते सर्व केले पाहिजे  असा मोलाचा संदेश देत चौफेर फटकेबाजी करत आजचा 'कॉलेज कट्टा' हा कार्यक्रम अतिशय रंगला खडकी शिक्षण संस्थेच्या  टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयांमध्ये आज वाणिज्य विभागा अंतर्गत 'कॉलेज कट्टा' या सदरामध्ये प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी विद्यार्थ्यांना "वाटेल ते करा, कोणतही तुमच्या आवडीचा काम तुम्ही करू शकता परंतु ते करत असताना त्या कामामध्ये  अतिशय उच्च पातळीचे प्राविण्य तुम्हाला मिळवणे आवश्यक आहे. 

कार्यक्रमाचे स्वरूपच कॉलेज कट्टा असल्यामुळे कॉलेजमध्ये घडणाऱ्या अनेकविध गोष्टींवर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यामध्ये अभ्यास, परीक्षा,नियमितपणा वेळेच व्यवस्थापन या गोष्टी तर होत्याच परंतु त्याचबरोबर चाकोरी बाहेरील शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे सुद्धा त्यांनी अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना पटवून दिले. "विद्यार्थ्यांनो जर तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये निपुण झालात तर कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही" हे सांगत असताना त्यांनी महाविद्यालयातील खेळ, नाटक, सिनेमा, रिल्स,  यूट्यूब व्हिडिओ,रेडिओ, रांगोळी अशा कितीतरी कलागुणांमध्ये निपुण असलेल्या आपल्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची दाखले देत तुम्ही कोणत्याही क्षेत्रात तुमचे नाव करू शकता मात्र त्यामध्ये तुम्हाला  झोकून देऊन काम करणे,प्राविण्य मिळवणे आवश्यक आहे असे सांगितले. त्याचबरोबर सध्याच्या काळामध्ये मुलांमध्ये असलेली विविध प्रलोभने,सोशल मिडिया वर खर्च होणारा वेळ, विद्यार्थ्यांमध्ये अगदी लहान वयातच वाढत जाणारी व्यसनाधीनता याचाही त्यांनी  उहापोह केला. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना,कला मंडळ,क्रीडा प्रबोधिनी, यांच्या माध्यमातून  उपलब्ध असलेल्या व्यक्तिमत्व विकासाच्या संधी यांचीही ओळख करून दिली. हे सगळं सांगत असतानाच विद्यार्थ्यांनी रोज काही ना काही तरी वाचावे आणि लिहिण्याची सवय करावी हे त्यांनी आग्रहाने नमूद केले. त्याचबरोबर विद्यार्थीदशेत शिस्त आणि वेळेचे नियोजन अत्यंत गरजेचे आहे हे त्यांनी नमूद केले.  महाविद्यालयीन जीवनामध्ये प्रवेश करत असतानाच विद्यार्थी तारूण्यात प्रवेश करत असतात  त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तारुण्य सुलभ भावना असणे स्वाभाविक आहे परंतु या गोष्टीवर  मात करून कशा पद्धतीने आपण आपल्या आयुष्याला आकार दिला पाहिजे आणि यासाठी आवश्यक असलेली शिस्त कशी सांभाळली पाहिजे हे त्यांनी विविध  महापुरुषांची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.  एकूणच आजचा 'कॉलेज कट्टा' खूपच रंगला. त्यांची  चौफेर फटकेबाजी विद्यार्थ्यांना खूपच भावली. नुकतेच मा. प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांना जाधवर फाउंडेशन कडून 'आदर्श प्राचार्य' म्हणून सन्मानित केले. वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनीही प्राचार्य डॉ संजय चाकणे यांचे अभिनंदन केले. उपप्राचार्य डॉ .अर्जुन मुसमाडे यांनी प्राचार्यांची ओळख करून दिली. 

याप्रसंगी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.जे डी नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर ज्योती वाघमारे यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी  

डॉ. दत्ताहरी मुपडे, प्रा. गौरी माटेकर, डॉ पद्माकर घुले, मयूर कढणे,भागवत शिंदे, कविता सिकदर, डॉ. निलेश काळे महादेव रोकडे शैलेंद्र काळे, शीतल रणधीर, पियू निर्भवाने , योगिता झोपे , आदी उपस्थित होते.


जाहिरात आणि बातमीसाठी संपर्क 

डॉ. संदीप गाडेकर 

संपादक
मोबाईल 820 818 50 37

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश