एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा




तळेगाव दाभाडे दि.7 (प्रतिनिधी)

गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कौतुकाचा एक विशेष दिवस आहे.  

संस्थेमध्ये ज्या शिक्षकांनी २५ वर्षांपेक्षा जास्त सेवा दिली अशा ०९ वरिष्ठ शिक्षकांचा संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे यांचे हस्ते त्यांना मानपत्र देऊन सम्मानित करण्यात आले. यावेळी सम्मानित सर्व शिक्षकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच संस्थेच्या प्राचार्य   डॉ. संध्या कुलकर्णी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. 

यावेळी संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे यांनी संस्थेत २५ वर्षांपेक्षा जास्त वर्ष सेवा दिलेल्या शिक्षकांना त्यांच्या प्रदीर्घ सेवेबद्दल शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे मनोगत व्यक्त केले. 

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. सचिन नाईक यांनी केले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे ईमेरिटस प्राध्यापक डॉ. राजेंद्र प्रसाद गुप्ता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी, समन्वयक डॉ तुषार खाचणे, भौतिकोपचार महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्नेहल घोडे, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.पूर्वा मांजरेकर आणि शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

जाहिरात व बातमीसाठी संपर्क 
डॉ. संदीप गाडेकर 
संपादक 

मोबाईल नंबर 820 818 50 37


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर