राजेंद्र गाडेकर यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार




जुन्नर दि.२८ (प्रतिनिधी) विद्या विकास मंदिर राजुरी शाळेचे उपशिक्षक श्री. राजेंद्र दिगंबर गाडेकर यांना  महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद  ग्रामीण विभाग यांच्या वतीने  जिल्हा गुणवंत  शिक्षक पुरस्कार सन २०२४ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी विद्याधाम प्रशाला शिरूर येथे होणार आहे.


 या कार्यक्रमासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे,  खासदार डॉ. निलेश लंके, आमदार अशोकबापू पवार, आमदार जयंत आसगावकर , आमदार भगवानराव साळुंखे उपस्थित राहणार आहेत. राजेंद्र गाडेकर सर विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून परिचित आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण लोणी हवेली ता.पारनेर येथे झाले असून दहावी बारावी व बी.एससी. पर्यंतचे शिक्षण पारनेर येथे झाले आहे. त्यानंतर त्यांनी डी.एड. तसेच एम. एस्सी. बी.एड. पर्यंत उच्च शिक्षण घेतले आहे. 

इयत्ता ५ वी स्कॉलरशिप, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, मंथन परीक्षा  याबाबतीत ते मार्गदर्शन करतात. तंत्र स्नेही शिक्षक म्हणून त्यांची विद्यालयास मोठ्या प्रमाणावर मदत होत आहे. इयत्ता ५ वी प्रवेश प्रक्रिया, विद्यालयातील किल्ले बनवा स्पर्धा, समर कॅम्प यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. रोज सकाळी शाळा भरण्यापूर्वी तसेच रविवारी, इतर सुट्ट्यांमध्ये त्यांचा जादा तास हमखास असतो.  शिक्षक म्हणून काम करताना त्याकडे नोकरी म्हणून न पाहता एक पेशा म्हणून ते पाहतात. विद्यार्थ्यांसाठी केलेले जादा काम, विद्यार्थी , पालक वर्ग यांच्या सोबत  असणारा संपर्क यामुळे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून परिचित आहेत. जिल्हा गुणवंत पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र गाडेकर यांचेवर जुन्नर तालुक्यातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश