ट्रेकिंग पलटनचां 9 वा वर्धापन दिन बाणेर-पाषाण टेकडीवर स्वच्छता करून साजरा
पुणे दि. 2 (प्रतिनिधी)
पुण्यातील टेकड्या ह्या सुंदर आणि हरित पुण्याचा श्वास आहे. पुणेकरांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी पुण्यातील सर्व टेकड्या स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त असणे गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेऊन ट्रेकिंग पलटन ग्रुपच्या 26 सदस्यांनी ट्रेकिंग फलटण ग्रुपच्या 9 व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी बाणेर पाषाण टेकडीवर स्वच्छता मोहीम राबवली.
बाणेर पाषाण टेकडी ही नियमितपणे स्वच्छ हवेसाठी जाणाऱ्या नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत. या टेकडीवर मोठ्या प्रमाणात नागरिक सकाळी आणि संध्याकाळी स्वच्छ हवेसाठी येत असतात. टेकडीच्या पायथ्यापासून ते तुकाई मातेच्या मंदिरापर्यंतचा सहा ते आठ किलोमीटर च्या परिसरात जाता येता काही समाज विघातक प्रवृत्तींनी पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकचे रॅपर्स, दारूच्या बाटल्या अँड कॅन, प्लास्टिकचे ग्लास, बिस्कीटचे आणि स्नॅक्सचे पॅकेट, इकडे तिकडे फेकून दिलेले आढळले. या पायवाटेवर अनेक स्वयंसेवी संस्था स्वच्छता राबवत असतात त्यामुळे पायवाटेच्या आसपास फारसा कचरा आढळला नाही. मात्र पायवाटे पासून दूर उतारावर गवतामध्ये, झाडाझुडपांमध्ये मोठ्या प्रमाणात असा प्लास्टिकचा पर्यावरणास विघातक कचरा आढळला, तो ट्रेकिंग पलटनच्या सदस्यांनी गोळा करून परिसर प्लास्टिक मुक्त केला.
Comments
Post a Comment