युवकांनी शासनकर्ते अधिकारी झाले पाहिजे - डॉ. संजीव सोनवणे

 


डावीकडून रमेश अवस्थे, सुनीता वाडेकर, कृष्णकुमार गोयल डॉ संजीव सोनवणे, डॉसंजय चाकणे, डॉ विश्वास गायकवाड , श्री आनंद छाजेड, मुरकुटे


पुणे दि. 11 (प्रतिनिधी) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय, खडकी आणि समर्थ युवा फाउंडेशन संचलित बोपोडी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन आज पार पडले. यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजीव सोनवणे यांनी आपले मत व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये तळागाळातील तसेच आर्थिक दुर्बल घटक असणारा वर्ग यामधील मुलांची संख्या जास्त दिसून येते. कारण त्यांच्याकडे शिकण्याची धडपड पाहायला भेटते. आयुष्यात काहीतरी करण्यासाठी ही मुले सतत झगडत असतात. हुशार असून फक्त आर्थिक परिस्थिती हालकीचे असल्याकारणाने त्यांच्या काही अपेक्षा दबलेल्या असतात. त्यालाच वाचा फोडण्यासाठी हे विद्यार्थी रात्रंदिवस स्वतःशी झगडून एक वेगळी उंची गाठण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे व त्यांना योग्य व चांगल्या प्रकारे अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक,  टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय आणि समर्थ युवा फाउंडेशनने पुढाकार घेऊन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना बोपोडी या ठिकाणी केली आहे. प्रशस्त व सर्व सोयी सुविधा युक्त हे या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे वैशिष्ट्य असेल. या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा फायदा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल यात तीळमात्र शंका नाही.

खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. कृष्णकुमार गोयल यांनी आपल्या मनोगतामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र चालू होत आहे हा आज सुवर्णक्षण म्हणता येईल. योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे काही मुले स्पर्था परीक्षांमध्ये मुकतात आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची व सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. तज्ञ व अनुभवी लोकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे काम केले जाईल. मला खात्री आहे जास्तीत जास्त विद्यार्थी या केंद्रातून अधिकारी बनतील असे सांगितले.

या केंद्रामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. चांगल्या सुविधा पुरविण्याचे काम केले जाईल. ज्या मुलांच्या अंगी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याची महत्त्वाकांक्षा आहे त्यांच्यासाठी वरदान ठरेल असे काम या केंद्रात केले जाईल असे मत समर्थ युवा फाउंडेशनचे मा. राजेशजी पांडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी केले. यामध्ये त्यांनी आज या ठिकाणी जे सेंटर चालू केले आहे त्यामध्ये 365 विद्यार्थी बसतील अशी सोय केलेली आहे. अद्ययावत ग्रंथालय, इंटरनेट सुवेधा दिल्या जाणार आहेत. दररोज दुपारी 12-01 या वेळेत मोफत खिचडी वाटप असणार आहे. सर्व सुविधा मिळतीलच फक्त त्याचा योग्य वापर विद्यार्थ्यांनी करून घ्यावा असे मत व्यक्त केले. 

या उद्घाटन समारंभासाठी मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, खडकी शिक्षण संस्थेचे सचिव श्री. आनंद छाजेड,संचालक श्री. रमेश अवस्थी, श्री. राजेंद्र भुतडा श्री.ज्ञानेश्वर मारकुटे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले तर आभार श्री. आनंद छाजेड यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश