दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर प्रा. डॉ.शुभांगी सूर्यकांत कु-हाडे व प्रा. प्राजक्ता गुलाबराव खटाटे यांचे पुस्तक प्रकाशित




पुणे दि. ११ (प्रतिनिधी) नवरंगाची उधळण, स्त्री शक्तीचा जागर नव पुस्तकांच्या संगे, भरू ज्ञानाची घागर या उक्ती प्रमाणेच आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर प्रा. (डॉ.) शुभांगी सूर्यकांत कु-हाडे व प्रा. प्राजक्ता गुलाबराव खटाटे यांचे पुस्तक 'Guidance & Counselling in Education: A practical Approach या पुस्तकाचे प्रकाशन  करण्यात आले.


सदर पुस्तक बी. एड अभ्यासक्रमावर आधारित आहे, तसेच या पुस्तकात एसएनडीटी विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  या चारही विद्यापीठाच्या Guidance & counselling  विषयाच्या अभ्यासक्रमाचा विचार केला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सदर पुस्तक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020)  सुसंगत आहे.बी. एड चे विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांसाठी सुद्धा हे पुस्तक उपयोगी आहे.

 बी एड अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना उपयोजनात्मक पातळीवर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहावी लागतात.यादृष्टीने लेखकांनी प्रत्येक युनीटवर आधारित ३ ते ४ नमुना प्रश्नांची उत्तरे- कशी लिहावीत याचा ऊहापोह केला आहे. तसेच प्रत्येक युनीट नंतर महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत. योग्य त्या ठिकाणी आकृत्यांचा वापर केलेला आहे. तसेच अधिक माहिती लवकर लक्षात राहण्यासाठी टेबल स्वरुपात आशय मांडलेला आहे.योग्य उदाहरणासह आवश्यक तो आशय स्पष्ट केलेला आहे.



 सदर पुस्तक पुण्यातील अत्यंत नावाजलेले 'निराली प्रकाशन' यांनी त्यांच्या सर्व पातळी वरील मानके लावून तपासून मगच प्रकाशित केलेले आहे. क्षेत्र कोणतेही असो ज्या क्षेत्रात विद्यार्थी आणि शिक्षक हे दोन ध्रुव असणार आहेत, त्या प्रत्येक क्षेत्रातील शिक्षकांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.

सदर पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख प्राध्यापिका (डॉ.) गीता शिंदे व अरणेश्वर अध्यापक महाविद्यालय पुणे चे प्राचार्य डॉ. बापूसाहेब चौगुले यांनी दोन्ही लेखिका प्रा. (डॉ.) शुभांगी सूर्यकांत कु-हाडे व प्रा. प्राजक्ता गुलाबराव खटाटे यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या या पुस्तकाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

जाहिरात व बातमीसाठी संपर्क 
डॉ. संदीप गाडेकर 
संपादक 

मोबाईल नंबर 820 818 50 37


Comments

  1. दोन्ही लेखकांचे हार्दिक अभिनंदन 💐💐👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश