डॉ. पी.ए. इनामदार टीडीएफ च्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

पुणे, दि.31 ऑक्टो.24 (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी संलग्न पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी(टीडीएफ) व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने दरवर्षी पुणे शहरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने तसेच पुणे शहरातील शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थेला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते.



   यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार डॉ.पी. ए. इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार यांना जाहीर करण्यात आला होता. पुणे शहरातील शैक्षणिक  क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. सदर पुरस्कार विशेष कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी.के. थोरात व पुणे विभाग टीडीएफचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामध्ये सन्मान चिन्ह,मानपत्र शाल श्रीफळ व  जी. के. थोरात लिखित तपस्वी हे पुस्तक भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
 यावेळी पुणे शहर  टीडीएफ चे अध्यक्ष प्रा. संतोष थोरात, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्राचार्य राज मुजावर, पुणे शहर जुनि. कॉलेज टीडीएफ चे अध्यक्ष प्रा. शशिकांत शिंदे, पुणे माध्यमिक सह. पतसंस्थेचे मा.अध्यक्ष विजयराव कचरे, माध्यमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अशोक धालगडे, अमजद पठाण तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037


Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश