मावळच्या महिला, तरुणांमध्ये बापूसाहेब भेगडेंच्या व्हिजनचीच चर्चा

 

तळेगाव दाभाडे : 
मावळ तालुक्याला सरदार दाभाडे राजघराणे, मदन बाफनासाहेब, कृष्णराव भेगडेसाहेब, स्वर्गीय 
रघुनाथदादा सातकर, स्वर्गीय ॲड.बी. एस. गाडे पाटील, रुपलेखाताई ढोरे, स्वर्गीय दिगंबरदादा भेगडे, बाळाभाऊ भेगडे अशी मोठी राजकीय परंपरा आहे. त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून तालुक्यात विकासाची गंगा आणली. नि:स्वार्थीपणे समाजसेवा केली.तालुक्याच्या विकासाला गती देत मुली, महिलांकडे कुणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, अशी पुरेपूर काळजी घेतली होती. आता याच पंक्तीत मावळ विधानसभा मतदारसंघाचे सर्वपक्षीय
अपक्ष आणि जनतेचे उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचे नाव घ्यावे लागेल. कारण बापूसाहेब भेगडे यांनी मावळ तालुक्यातील मुली, महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेत तसे जाहीर वचन दिले आहे. बापूसाहेब भेगडे यांच्या या व्हिजनची तालुक्यातील महिला, तरुणांमध्ये
नवचैतन्य पसरले आहे.महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत असताना कायद्याची जरब निर्माण होणे गरजेचे आहे. वास्तविक सर्वच महिलांना सुरक्षितता हवी आहे.मुली, महिलांकडे कुणी वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करता कामा नये. जर कुणी असे करत असेल तर त्यांना तिथल्या तिथे धाक दाखवण्याची गरज असते. बापूसाहेब भेगडे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना आयोजित सभेत बोलताना मुलींचे पालकत्व घेत असल्याचे जाहीर करीत पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा बहिणींना विश्वास दिला आहे. बापूसाहेब 
भेगडे यांना वाढता पाठिंबा मिळत आहे.
मावळ हे एक कुटुंब आहे. बापूसाहेबांच्या रुपाने महिलांना भाऊ भेटेल. लहान मुले व तरुणांना चांगला मामा मिळू शकणार आहे. 
           गेल्या पाच वर्षात मावळातील कोवळी मुले व्यसनाच्या आहारी गेल्याची, तसेच गुंडगिरी प्रवृत्ती निर्माण होत असल्याची परिस्थिती आहे. तालुक्याची संस्कृती बिघडून वेगळ्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे महिलांच्या, कोवळ्या मुलींच्या सुरक्षिततेची हमी कुणी तरी घेण्याची गरज आहे. ती जबाबदारी बापूसाहेब भेगडे यांनी अगदी आनंदाने उचलली आहे, ही त्यांच्यातील नेतृत्वगुणाची चुणूक आहे. 
           म्हणूनच आज मावळ तालुक्यातील गावागावातील महिला वर्गाला आधार मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अपप्रवृत्तीना जशास तसे उत्तर देणारा लोकप्रतिनिधी हवा असल्याचे उघड बोलले जात आहे. आम्ही बापूसाहेब भेगडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास महिला देत आहेत. मावळच्या खऱ्या संस्कृतीकडे नेणारा उमेदवार म्हणजे बापूसाहेब भेगडे हेच आहेत. 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037


Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश