मावळमध्ये शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान माध्यमिक विद्यालयाची तीनशे गुणांसाठी तपासणी
परंदवडी येथील बा.न.राजहंस विद्यालयात गुणवत्ता संवर्धन तपासणी पथकाकडून तपासणी करण्यात आली. तपासणी अंति तयार झालेली गुणदान पुस्तिका मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्द करताना तपासणी पथकातील अधिकारी. तळेगाव दाभाडे दिनांक 23 ( संपादक - डॉ. संदीप गाडेकर) पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान २०२४-२५ संपूर्ण पुणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये डिसेंबर महिन्यात राबविण्यात येत आहे. पुणे जिल्हा परिषद पुणे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ भाऊसाहेब कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मावळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळूंज यांच्या नियोजनाखाली मावळ तालुक्यात १० डिसेंबरपासून या अभियानास सुरुवात झाली. सध्या अभियानांतर्गत तपासणी पथकाकडून शाळा तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मावळ तालुक्यातील ८८ माध्यमिक शाळांची शिक्षण विभागाच्या ८ पथकाकडून तपासणी करण्यात आली. मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, मावळ तालुकाध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, पांडुरंग पोटे, र...