रक्षक झाला भक्षक : विसापूर किल्ला परिसरात पाच वर्षांच्या चिमुकलीवर बंदोबस्तावरील पोलिसाकडून अत्याचार : मावळात पुन्हा निर्भया ?


लोणावळा दि. 26 (प्रतिनिधी) बदलापूर प्रकरण , मावळातील कोथूर्णे प्रकरण या  सारख्या अनेक घटनांमधून बोध घेण्याचे सोडून रक्षकच भक्षक होत असल्याचे दिसून येत आहे. विसापूर किल्ला परिसरात आई-वडिलांसोबत फिरण्यासाठी आलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने लैंगिक अत्याचार केला. मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आडोशाला नेऊन तिच्यावर दि. २५ डिसेंबर रोजी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय धक्कादायक असून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी संबंधित पोलिसाला अटक केली आहे. सचिन वसंत सस्ते असे अटक केलेल्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.



लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाताळनिमित्त मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पर्यटन स्थळावर सुट्टीच्या अनुषंगाने लोक फिरण्यासाठी येतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या विसापूर किल्ल्यावर पुणे ग्रामीण मुख्यालय येथून अधिकचा बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्यामध्ये पोलीस सचिन सस्ते हा देखील विसापूर किल्ला परिसरात बंदोबस्तावर होता.


विसापूर किल्ला पाहण्यासाठी पाच वर्षीय चिमुकली तिच्या आई-वडिलांसोबत आली होती. त्या चिमुकलीला सचिन सस्ते याने चॉकलेटचा आमिष दाखवले आणि आडोशाला नेले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मुलीने आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तात्काळ पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पोलीस सचिन सस्ते याला अटक केली आहे. 



पोलिस प्रशासनच महिलांची व मुलींची सुरक्षा करू शकत नसेल तर संरक्षण कोणाकडे मागायचे असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 
डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037



महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay





Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास