विद्यार्थ्यांसाठी महापुरुषांचे विचार दिशादर्शक-- प्रा. विवेक गुरव

 

 वडगाव मावळ दि. ३० (प्रतिनिधी)  विद्यार्थ्यांसाठी महापुरुषांची चरित्रे आणि विचार दिशादर्शक ठरतात विद्यार्थ्यांनी महापुरुषांची चरित्र वाचले पाहिजेत महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात मोलाचे ठरतात असे प्रतिपादन यशदाचे व्याख्याते प्रा. विवेक गुरव यांनी केले श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य बी.बी.ए. महाविद्यालय वडगाव मावळ या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात ते बोलत होते हे शिबिर नागाथली ता. मावळ जि पुणे इथे 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले होते या शिबिरात प्रसिद्ध शिवव्याख्याते संपत गारगोटे यांनी छत्रपती संभाजी महाराज या विषयावर विचार मांडले प्रा. सोमनाथ कसबे यांनी युवकांपुढील आव्हाने या विषयावर विचार मांडले, शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी गावाचा परिसर, गावातील रस्ते स्वच्छ केले तसेच विविध प्रबोधनात्मक आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर पथनाट्य सादर केली.


       शिबिराच्या समारोपप्रसंगी संस्थेचे संचालक राज खांडभोर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री तुकाराम आसवले ,  सचिव अशोक बाफना ,उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, दत्ताभाऊ असवले, प्राचार्य अशोक गायकवाड उपस्थित होते 

  महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. रोहिणी चंदनशिवे यांनी सूत्रसंचालन केले प्रा. डॉ. जया धावरे यांनी आभार मानले विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 
डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037



महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर