नाटक व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम - रो. मिलिंद शेलार

 


     तळेगाव दाभाडे  दि. 20 (संपादक - डॉ.संदीप गाडेकर ) नाटक व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम असते. स्पर्धेमध्ये यश अपयश महत्त्वाचे नसून भावना, संस्कार व्यक्त करता येणाऱ्या या व्यासपीठावर सर्वोत्तम कला सादर करावी असे आवाहन रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम. आय. डी. सी. चे अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. ते रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी पुणे, जिल्हा परिषद शिक्षण विभाग पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण आंतरशालेय मावळ तालुकास्तरीय नाट्य स्पर्धा मावळ भूषण मामासाहेब खांडगे सभागृहात उत्साहात पार पडल्या. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, मिलिंद शेलार सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, रंगमंचाच्या उद्घाटनाने करण्यात आली. प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांचा स्वागतपर सत्कार रोटरी क्लब ऑफ तळेगाव  शेलार यांच्या हस्ते तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वागतपर सत्कार स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक रावसाहेब सिरसट यांच्या हस्ते करण्यात आला.

     प्रास्ताविकाद्वारे बाल कलाकारांनी नाट्यकलेची आवड जोपासावी याकरिता प्राथमिक व माध्यमिक या गटांतर्गत तालुकास्तरीय नाट्य स्पर्धेचे आयोजन केल्याचे स्पर्धेचे प्रतिनिधी विजय जाधव यांनी स्पष्ट केले. नाट्यकलेमध्ये अभिनयाला अनन्यसाधारण महत्त्व असते. आपल्या कलेद्वारे विद्यार्थ्यांनी विजयी व्हावे असे मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी केले. प्रभावी अभिनय आणि उत्तम कलाविष्काराने विद्यार्थ्यांनी नाट्यकला सादर करून विजयी व्हावे असे मनोगत कार्यक्रमाचे परीक्षक चंद्रकांत बुटे यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष रो. संतोष खांडगे यांनी नाट्य स्पर्धा आयोजित केल्याबद्दल या उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमास

स्पर्धेचे परीक्षक चंद्रकांत बुटे, प्रमोद पारधी, विजयकुमार तांबे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संदीप मगर, सुनील खोल्लम, पांडुरंग पोटे, विलास टकले, सुनील रहाटे, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक  रावसाहेब शिरसाट पर्यवेक्षिका रेणू शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

          नाट्य स्पर्धेकरिता तालुक्यातील बहुसंख्य विद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 
नाट्य करंडक अंतिम निकाल तालुकास्तरीय
 प्राथमिक विभाग : प्रथम क्रमांक
 व्ही. पी. एस. इंग्लिश स्कूल लोणावळा 
(जगा आणि जगू द्या)
  माध्यमिक विभाग : प्रथम क्रमांक स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे (नव्या युगातील झाडांची नवी कहाणी )
 हिंदी विभाग:प्रथम क्रमांक 
न्यू इंग्लिश स्कूल चांदखेड (आनंदी तुम पढो ) 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा शिरसाट यांनी केले. तर आभार  रो.संदीप मगर यांनी मानले.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो. 82081805037

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश