मावळमध्ये शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान माध्यमिक विद्यालयाची तीनशे गुणांसाठी तपासणी
परंदवडी येथील बा.न.राजहंस विद्यालयात गुणवत्ता संवर्धन तपासणी पथकाकडून तपासणी करण्यात आली. तपासणी अंति तयार झालेली गुणदान पुस्तिका मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्द करताना तपासणी पथकातील अधिकारी.
तळेगाव दाभाडे दिनांक 23 ( संपादक - डॉ. संदीप गाडेकर) पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान २०२४-२५ संपूर्ण पुणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये डिसेंबर महिन्यात राबविण्यात येत आहे. पुणे जिल्हा परिषद पुणे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ भाऊसाहेब कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मावळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळूंज यांच्या नियोजनाखाली मावळ तालुक्यात १० डिसेंबरपासून या अभियानास सुरुवात झाली. सध्या अभियानांतर्गत तपासणी पथकाकडून शाळा तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
मावळ तालुक्यातील ८८ माध्यमिक शाळांची शिक्षण विभागाच्या ८ पथकाकडून तपासणी करण्यात आली. मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, मावळ तालुकाध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, पांडुरंग पोटे, रमेश फरताडे, हाके , विकास तारे, रेखा परदेशी, नूतन कांबळे आदी पथक प्रमुख यांच्यासह विस्तार अधिकारी, केंद्रप्रमख, मुख्याध्यापक, शिक्षक व लिपिक आदींचा या पथकात समावेश होता.
—-------------------------------------------------------
ग्रामीण व शहरी भागातील गुणवत्तेची दरी कमी करणे
—---------------------------------------------------
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील गुणवत्तेची दरी कमी करण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान राबविण्यात आले. शालेय शैक्षणिक जगतामध्ये गुणवत्तेचे संवर्धन करणे, शाळांची क्षमता संवर्धन वृद्धीगत करणे, शाळा शाळांमध्ये असणाऱ्या उनिवा दूर करणे, शिक्षक आणि शाळेचे कार्य या निमित्ताने परिचित करून देणे हा अभियानाचा असून या अभियानात तिनशे गुणांसाठी शालेय कामकाज, वर्ग, दप्तर तपासणी करण्यात आली.
—------------------------------------------------------------------
नव्या शतकातील कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, शैक्षणिक लाभाच्या योजना पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, शाळा आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण बनवणे, कृतीयुक्त शिक्षण व आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाटचालीसाठी शाळांना प्रेरित करणे, स्वच्छता आरोग्य व वाचन विषयक संस्कार कायमस्वरूपी विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे, प्राप्त विद्यार्थ्यांना लाभाच्या योजना पर्यंत पोहोचविणे, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, शिक्षण विभाग व शाळा यांचा समन्वय दृढ करणे, डिजिटल लाईझ स्कूल बनवने, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शाळांमधील उपक्रम इतर शाळा व प्रशासनास माहित करून देणे अशी या अभियानाची उद्दिष्टे आहेत.
—----------------------------------------------------
सदर तपासणी तालुका तसेच जिल्हास्तरावर ग्रामीण व शहरी व्यवस्थापनाच्या विद्यालयामध्ये राबविण्यात येणार आहे, प्रत्येक तालुक्यातून माध्यम, गट व विद्यार्थी संख्येनुसार केलेल्या गटातून प्रथम तीन क्रमांकाच्या शाळा निवडल्या जाणार असून त्या सर्व शाळा जिल्हास्तर स्पर्धेसाठी पात्र राहणार आहेत, गटनिहाय प्रथम तीन क्रमांकाच्या शाळा शहर तालुकास्तरावर पारितोषिकास पात्र ठरणार आहेत.
----------------------------------------------------
Comments
Post a Comment