हॅपी फ्लॉवर्स प्री प्रायमरी स्कूल तळेगाव दाभाडे यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

 


तळेगाव दाभाडे दि. 23 (संपादक - डॉ.संदीप गाडेकर )  येथील कालेकर एजुकेशन सोसायटीच्या  हॅपी फ्लॉवर्स प्री प्रायमरी स्कूल तळेगाव दाभाडे यांचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात साजरे झाले, स्नेहसंमेलनास  उपस्थित पालकांपैकी प्रथम येणाऱ्या पाच पालकांमधून श्री. व सौ. भालावी यांना अध्यक्ष निवडले गेले, यानंतर सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. 

प्ले ग्रुप नर्सरी ज्युनिअर केजी सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम साजरे केले यामध्ये पोलीस, सावित्रीबाई फुले , भाजीवाला, ट्रॅफिक आणि सेफ्टी रुल ची माहिती देणारा हावलदार, झाड होऊन वृक्ष वाचवा व वृक्षाचे संवर्धन करा , सेव्ह गर्ल म्हणजेच बेटी बचाव बेटी पढाओ असा संदेश दिला, देशभक्तीपर भगतसिंग व टीचर मार्फत युनिटी इन डायव्हर्सिटी विविधतामध्ये एकता असा संदेश देणारा ग्रुप डान्स साजरा करण्यात आला, तर ग्रुप डान्स मध्ये कोळीगीत आणि इंग्लिश विंग्लिश या धर्तीवर इंग्लिश शिकणे आपल्या भाषेबरोबर कसे आवश्यक आहे हाही संदेश देण्यात आला. 

कार्यक्रम सकाळी साडेदहा वाजता सुरू होऊन तीन तासापर्यंत चालला, यामध्ये पालक वर्ग, विद्यार्थी वर्ग यांनी उत्साहाने सहभाग घेतला, क्रिसमस निमित्त सांताक्लॉज स्टेजवर अवतरला आणि त्याने सर्वांना गिफ्ट देऊन शुभेच्छा दिल्या सांताक्लॉज स्टेजवर येताच मुलांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि वेगळाच आनंद त्यांना प्राप्त झाला. यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. स्नेह संमेलनाचे नियोजन मुख्याध्यपिका पूनम कालेकर व सर्व स्टाफ यांनी केले.



 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 
डॉ.संदीप गाडेकर 
संपादक 
मो. ८२०८१८५०३७










Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश