आदर्श जुनिअर कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न


उजवीकडून डॉ. दत्तात्रय बाळसराफ, प्रा. वसंत पवार, श्री. यादवेंद्र खळदे, मनीषा लगड, श्री. कमलेश कार्ले, श्री. संतोष खामकर,श्रीमती आशा सोहोनी,सौ. प्रतिज्ञा मांडे, सौ. वैशाली इनामदार आदी.

तळेगाव दाभाडे दि. २५ (संपादक - डॉ. संदीप गाडेकर ) येथील मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित आदर्श जुनियर कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन कार्यक्रम  शाळेच्या प्रांगणात  उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष कमलेश कार्ले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात रांगोळी दालनाच्या उद्घाटनाने व  ईशस्तवनाने झाली. संस्थेचे सचिव यादवेंद्र खळदे,सहसचिव प्रा. वसंत पवार,  सदस्य डॉ.दत्तात्रय बाळसराफ, खजिनदार नंदकुमार शेलार,  श्रीमती आशा सोहोनी, मुख्याध्यापक संतोष खामकर मुख्याध्यापिका प्रतिज्ञा मांडे, आदर्श बाल मंदिर प्रमुख  वैशाली इनामदार, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या मनिषा लगड आदी मान्यवर उपस्थित होते.



 प्रास्ताविक ज्युनिअर कॉलेजचे प्र.प्राचार्य संजय देवकर यांनी केले. कमलेश कार्ले यांनी विद्यार्थ्यांना सर्व छोट्या-मोठया व्यवसायाच्या  संधी व त्याचे महत्त्व पटवून दिले.  अध्यक्षीय  भाषणात यादवेंद्र खळदे  यांनी विद्यार्थ्यांना आपले अभ्यासातील सातत्य ठेवून पालकांचे व कॉलेजचे नाव उज्वल होईल असे यश संपादन करावे असे आवाहन केले. प्रा. वसंत पवार यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या विविध स्पर्धेतील यशाचे कौतुक केले. डॉ. दत्तात्रय  बाळसराफ यांनी नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या संधी याबाबत मोलाचा सल्ला दिला. प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा व बौद्धिक स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन कौतुक केले. दुपार सत्रात विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी मराठी नृत्य उत्तम सादर  केले. पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. अंकलेश निसर्गंध व  सुरेखा नवले यांनी तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रूपाली पाटोळे व  दिपाली रामाने यांनी केले. कार्यक्रमात  आशा सोहोनी यांनी इयत्ता बारावी कला शाखेच्या कु.आश्विता करवंदे aया विद्यार्थिनीला  त्यांच्या कुटुंबीयांनी जाहीर केलेल्या स्कॉलरशिपचा धनादेश सुपूर्द करून तिचे कौतुक केले. 


तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या "अभिजात" या हस्तलिखिताचे प्रकाशन सोहनी मॅडमच्या हस्ते झाले.  त्यांनी आरोग्य व आहार या विषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले .बक्षीस पात्र विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन प्रा. प्रणिता गजभिव व रुपाली पाटोळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. पुष्पलता धुमाळ यांनी केले.कार्यक्रमास सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व  शिक्षकेतरांचे तसेच विद्यार्थ्यांचे उत्तम सहकार्य लाभले.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 
डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037



महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay





Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा