राष्ट्रप्रेम व देशभक्ती वाढविणे महत्वाचे - डॉ. काशिनाथ देवधर

 

पुणे दिनांक 22 (प्रतिनिधी)खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडकी, पुणे. राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित विशेष हिवाळी शिबिर दिनांक 15 जानेवारी 2025 ते दिनांक 21 जानेवारी 2025 या कालावधीत मौजे साळुंब्रे, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे समारोपप्रसंगी जेष्ठ शास्त्रज्ञ , खडकी शिक्षण संस्थेचे संचालक तथा DRDO चे माजी संचालक माननीय डॉ. काशिनाथ देवधर यांच्या हस्ते समारोप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्यांनी आजच्या तरुणांनी तसेच नागरिकांनी देश प्रेम,  राष्ट्रहिताच्या साठी काम करणे आवश्यक आहे, प्रामाणिकपणे आपले काम केले तर आपण मोठ्या पदांपर्यंत  पोहोचू  शकतो. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून हिवाळी शिबिरात शिबिरार्थींनी   केलेल्या कार्याचे कौतुक केले, तसेच भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम  यांच्या समवेत त्यांनी काम केलेले काही प्रसंग सांगितले. भारताचे राष्ट्रपती यांनी त्यांच्यावर एका प्रसंगी टाकलेला विश्वास हा प्रसंग त्यांनी सांगितला. यावेळी  साळुंब्रे गावचे विद्यमान सरपंच विशाल राक्षे कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उपस्थित होते. त्यांनी शिबिरार्थींनी केलेले कामाचे कौतुक केले तसेच शिबिरार्थींनी भारत सरकारच्या युथ फॉर माय भारत युथ फॉर डिजिटल लिटरसी या विषयावर आधारित शिबिराची थीम घेऊन गेल्यामुळे स्वयंसेवकांनी गावामध्ये डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने सर्वेक्षण केले. डिजिटल माध्यमांविषयी जनजागृती केली ,शासनाच्या योजना घरोघरी जाऊन सांगितल्या याबद्दल व गावाच्या स्वच्छतेच्या बाबतीत प्लास्टिक कचरा मुक्त करण्यासाठी शिबिरार्थींनी दिलेले योगदान व वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान याविषयी केलेल्या कामाचे कौतुक करून विशेष आभार मानले. आणि असेच पुढील वर्षी पुन्हा गावात काम घेण्यासाठी आवाहन केले. 

यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. सुचेता दळवी यांनी ग्रामस्थ व सरपंच यांचे आभार मानले व शिबिरार्थींचे कौतुक केले. सदर प्रसंगी साळुंब्रे ग्रामपंचायतचे उपसरपंच सुभाष राक्षे, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य रवींद्र विधाते, ग्रामपंचायत सदस्य कमलेश राक्षे, नंदा आगळे, शितल दवणे, स्नेहल विधाटे  तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. सदर शिबिराचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचा स्वयंसेवक कुमार राकेश परदेशी यांनी केले तर प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रमाधिकारी डॉ. निलेश काळे यांनी केले,  तर आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्वयंसेवक कुमार रितेश वाघमारे यांनी मानले.

शिबिर यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रमाधिकारी डॉ. निलेश काळे, डॉ.पद्माकर घुले, प्राध्यापिका अर्चना तारू, कर्मचारी पवन पवार यांनी सात दिवस  यांनी शिबिराचे संयोजन केले. तसेच महाविद्यालयातील प्रा. ज्योती वाघमारे, प्रा. कांचन आपटे यांनी शिबिर निवासस्थानी एक व. दोन दिवस मुक्कामी राहून स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले तसेच शिबिर यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना समिती प्राध्यापिका कविता चव्हाण यांनी देखील विशेष योगदान दिले. शिबिराचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे माजी संचालक डॉ. सुरेश अलिझाड यांच्या हस्ते झाले. स्वयंसेवकांसाठी दुपारच्या स्टेशनला व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. सायबर सुरक्षितता यावर प्रा. राजेंद्र लेले, डिजिटल साक्षरतेचे महत्व यावर प्रा. गौरी माटेकर, दैनंदिन जीवनातील देशसेवा यावर डॉ. अविनाश कोल्हे, आर्थिक साक्षरता काळाची गरज यावर डॉ.सुचेता दळवी, पुस्तक समाजाचे मस्तक यावर प्रा. महादेव रोकडे असे व्याख्यानाचे विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  महाविद्यालयातील जवळपास सर्वच प्राध्यापकांनी कर्मचाऱ्यांनी शिबिरास भेट देऊन  शिबिरास सदिच्छा व्यक्त केल्या होत्या.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037



महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा