सरस्वती विद्यामंदिर इंदोरीचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

तळेगाव दाभाडे दि. १२ (प्रतिनिधी) सरस्वती शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्यामंदिर इंदोरीचे स्नेहसंमेलन दिनांक 3 जानेवारी रोजी संपन्न झाले.बालवाडी व प्राथमिक विभागाने दुपार सत्रात स्नेहसंमेलन साजरे केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे स्नेहसंमेलनात 'माय मराठी' ही संकल्पना घेण्यात आली होती. दोन्ही विभागांनी अतिशय सुंदर सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच माननीय शशिकांत शिंदे  तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषद माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी माननीय निलेश धानापुने उपस्थित होते. स्नेहसंमेलन  उदघाटन पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय सुरेश झेंड यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख बालवाडी प्रमुख अनुराधा  बेळणेकर  यांनी प्रमुख पाहुणे परिचय करून दिला अहवाल वाचन प्राथमिक मुख्याध्यापक नितीन शिंदे यांनी केले. सरस्वती शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रमुख अतिथींचा सन्मान केला. बालवाडी विभागाच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या बालनगरी या हस्तलिखिताचे उद्घाटन  कार्यक्रमाध्यक्ष सरपंच शशिकांत शिंदे तर प्राथमिक विभागाच्या स्मृती या हस्तलिखिताचे उद्घाटन माननीय सभापती  विठ्ठलराव शिंदे यांनी केले. 

प्रमुख पाहुणे माननीय निलेश धानापुने यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी विकसनामध्ये स्नेहसंमेलनाचे महत्त्व स्पष्ट केले व शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. माननीय जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे यांनी शाळेच्या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त  केले व शाळेच्या विस्ताराची मनीषा व्यक्त केली .पालकांना मार्गदर्शन केले. सरपंच माननीय शशिकांत शिंदे व उपसरपंच माननीय संदीप ढोरे यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक केले .कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.  ललिता कवडे यांनी आभार मानले. 

कार्यक्रम प्रसंगी सरस्वती शिक्षण संस्था उपाध्यक्ष माननीय दिलीप कुलकर्णी  ,कार्यवाह श्री प्रमोद देशक खजिनदार सुचित्राताई चौधरी ,शिक्षण समिती सदस्य डॉ. ज्योतीताई  चोळकर ,सदस्य  विश्वास देशपांडे , सुनील आगळे  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनीषाताई ढोरे शाळा व्यवस्थापन समिती सदस्या व ग्रामपंचायत  सदस्या  सुरेखाताई शेवकर ग्रामपंचायत सदस्य लतिकाताई शेवकर माजी कार्यवाह रमेश थिटे, सरस्वती तळेगाव माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका रेखा परदेशी, प्राथमिक मुख्याध्यापक नवनाथ गाढवे, बालवाडी प्रमुख सोनाली काशीद, माजी मुख्याध्यापिका निता दहीतुले, अलका रणदिवे ज्येष्ठ नागरिक भाऊ ढोरे व विष्णू शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमात बक्षीस वाचन अर्चना एरंडे यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नमाला भुजबळ यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतना शेवकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन प्राथमिक विभाग मुख्याध्यापक नितीन शिंदे व बालवाडी विभाग प्रमुख अनुराधा बेळणेकर यांनी केले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने स्नेहसंमेलन यशस्वीपणे पार पडले. स्नेहसंमेलनास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037



महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा