"निरंकारी निर्गवी आणि निर्मोही व्यक्तिमत्त्वाचे कर्तृत्त्व संपन्न नेते म्हणजे स्व. मा. नामदार चंद्रकांतजी छाजेड" - कृष्णकुमारजी गोयल स्वर्गीय ना.चंद्रकांतजी छाजेड यांचा आठवा स्मृतिदिन साजरा



पुणे दि. १३ (प्रतिनिधी) खडकी शिक्षण संस्थेचे मा. चिटणीस आणि मा. पर्यटन राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य स्वर्गीय श्री चंद्रकांतजी छाजेड यांचा आठवा स्मृतिदिन खडकी येथील, खडकी शिक्षण संस्थेच्या, टिकाराम जगन्नाथ वरिष्ठ महाविद्यालयाच्या श्री. दत्ताजी गायकवाड सभागृहात पार पडला.


यानिमित्ताने संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. कृष्णकुमारजी गोयल यांची विशेष उपस्थिती होती. व्यासपीठावर खडकी शिक्षण संस्थेचे चिटणीस आणि स्व. चंद्रकांतजी छाजेड यांचे सुपुत्र श्री आनंद छाजेड आणि त्यांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. संस्थेचे पदाधिकारी, विविध शाखेचे प्रमुख, पर्यवेक्षक,अध्यापक, प्राध्यापक,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि सेवक वर्ग उपस्थित होता.


स्व.चंद्रकांत छाजेड यांच्या आठव्या स्मृतीदिनी श्री कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते दै. पुण्यनगरी प्रकाशित, "स्मृती सुगंध विशेषांकाचे"प्रकाशन पार पडले. या विशेषांकामध्ये नामदार चंद्रकांत छाजेड यांच्या राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध आठवणींना अनेकांनी शब्द रूपात उजाळा दिला.

 सहृदयी, सहकारी स्व. चंद्रकांत छाजेड हे महाराष्ट्राच्या सामाजिक,राजकीय, क्षेत्रातील एक निर्विवाद कर्तुत्वाचा दानशूर, निरंकारी व्यक्तिमत्त्वाचे, गोरगरिबांचे नेते होते असे यावेळी उद्गार कृष्णकुमार गोयल यांनी काढले. 



  ना.चंद्रकांतजी छाजेड यांचे चिरंजीव आणि खडकी शिक्षण संस्थेचे विद्यमान चिटणीस श्री. आनंद छाजेड यांनी आपल्या वडिलानी आपल्यावरती केलेल्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक संस्कार-संस्कृतीचा भावस्पर्शी उजाळा दिला. याप्रसंगी छाजेड कुटुंबीयातील चंद्रकांत छाजेड यांच्या सुविद्य पत्नी मा. निर्मला भाभी, मुली अर्चना लुनावत,  माधवी चोरडिया, मुलगा आनंद छाजेड यांच्या सुविद्य पत्नी सपनाभाभी यांनी आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.या निमित्ताने  माधवबाग", औंध शाखा यांच्यावतीने खडकी शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या करिता मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विविध शारीरिक चाचण्या,नेत्र तपासणी, रक्त तपासणी यांचा लाभ सर्वांनी घेतला. 

 कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. प्रास्ताविक आणि सूत्रसंवादन प्रा. महादेव रोकडे यांनी केले‌. उपप्राचार्य डॉ.अर्जुन मुसमाडे, डॉ. स्वाती राजन, यांनीही आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.कार्यक्रमाचे आभार प्रा. नितीन पैलवान यांनी मानले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037



महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा