कुणाचेही फॉलोअर्स बनू नका.. लीडर बना- डॉ. सुरेश अलीझाड

 


पुणे दि. १९ (प्रतिनिधी) खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडकी, पुणे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी शिबिर मौजे साळुंब्रे, तालुका मावळ, जिल्हा पुणे.  येथे आयोजित करण्यात आलेले आहे. शिबिराचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे माजी संचालक डॉ. सुरेश अलिझाड यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी कोणाचेही फॉलोवर्स बनवू नका तर लीडर बना असे उद्गार काढले तसेच समाज घडवणारे तरुण निर्माण होणे आवश्यक आहे चांगला समाज राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्वयंसेवक घडू शकतो तसेच माणूस घडवण्याच्या प्रक्रियेतील माणूस म्हणजे प्राचार्य डॉ. संजय चाकणे आहे असे प्रतिपादन मत व्यक्त केले. प्रत्येकामध्ये राजहंस धरलेला आहे त्यामुळे सर्वांनी यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे अभ्यास करणे गरजेचे आहे त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना विभागातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग करून घेणे गरजेचे आहे तसेच भारत सरकारच्या माय भारत पोर्टलच्या व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गाईडलाईनुसार युथ फॉर माय भारत युथ फॉर डिजिटल लिटरसी यावर आधारित त्यांनी मार्गदर्शन केले प्रत्येकाने मोबाईलचा अतिरिक्त वापर करणे टाळावे व भारतातील मोबाईल चा वाढलेला वापर आणि डिजिटल भारत कसा वाढत आहे याबद्दल उदाहरणे दिली तसेच 2013 ते 2024 या कालावधीत मोबाईल वापरणाऱ्यांचे प्रमाण, वाढले इंटरनेट वापरणाऱ्यांचे प्रमाण टक्केवारीत कसे बदललेले आहेत याबद्दल माहिती दिली.



 त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा खडकी शिक्षण संस्थेचे सहसचिव माननीय डॉ. संजय चाकणे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले तसेच इव्हेंट मॅनेजमेंट शिकताना तसेच चांगले सूत्रसंचालक आणि एकूण व्यक्तीच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी अशी शिबिरे उपयुक्त असतात असे मत व्यक्त केले, विद्यार्थ्यांना चुकले तर चुकले त्यातून पुन्हा शिकता येते परंतु चुकेल म्हणून शिकायचे नाही असं करू नका असे आवाहन केले. यावेळी साळुंब्रे गावचे ज्येष्ठ नेते  संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव राक्षे कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्षस्थानी उपस्थित होते त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगतात सहकार क्षेत्र व विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर व्यसनापासून मुक्त रहा प्रत्येक स्त्रीचा आदर करा प्रामाणिकपणे कष्ट करणे आवश्यक आहे तुमच्यासारखे तरुणच देशाचे भविष्य आहे तसेच यावेळी त्यांनी सुनीता विल्यम यांचे उदाहरण विद्यार्थ्यांना दिले. यावेळी  उपसरपंच सुभाष राक्षे तसेच ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच रवींद्र विधाते व राहुल दवणे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. श्री रवींद्र विधाते यांनी गावातील नागरिकांच्या वतीने त्यामध्ये पूर्णतः सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले व एकमेकांच्या साह्याने उत्तम गावच्या विकासासाठी काम करू तसेच आमचे गाव निवडले म्हणून त्यांनी आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. स्वच्छता दळवी,  मराठी विभाग प्रमुख प्रा. महादेव रोकडे,    सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. निलेश काळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक कुमार राकेश परदेशी व कुमार रितेश  वाघमारे यांनी केले तर आभार कुमार रितेश वाघमारे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजने विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पद्माकर घुले,प्राध्यापिका  अर्चना दारू, प्रा. मेहनाज कौशर, प्रा. ज्योती वाघमारे, प्रा. कविता चव्हाण , सेवक श्री. पवन पवार, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक यांनी योगदान दिले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037



महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा