पुणे दि.२२ (प्रतिनिधी) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एन.ई.पी) -२०२० प्रभावी जनजागृती निर्माण करण्याच्या हेतूने सर्व संलग्नित व स्वायत्त महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने खडकी शिक्षण संस्थेच्या, टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने कॅम्पस टूर उपक्रमांचे आयोजन केले. यामध्ये खडकी परिसरातील कर्नल भगतसिंग हायस्कूल, लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय, ग्यारीसन हायस्कूल, चेतन दत्ताजी इंग्रजी प्रशाला, टि.जे.कनिष्ठ महाविद्यालय, आलेगावकर ज्युनिअर कॉलेज, सेंट जोसेफ बॉईज हायस्कूल, त्यागी हायस्कूल, एम. व्ही.एस. ज्युनिअर कॉलेज आणि सी.के.गोयल ज्युनिअर कॉलेज, अशा अनेक शाळा- महाविद्यालयातील अध्यापकांसह विद्यार्थी, पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

  आयोजित कार्यशाळेचा उद्देश इयत्ता नववी, इयत्ता दहावी आणि बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०ची वैशिष्ट्ये आणि फायदे समजून सांगणे तसेच महाविद्यालयीन वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी प्रदान करणे हा होता.

  कार्यशाळेचे प्रमुख वक्ते मार्गदर्शक, खडकी शिक्षण संस्थेचे सहसचिव व टिकाराम जगन्नाथ वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.संजय चाकणे यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण (एन.ई.पी.)-२०२०चा शैक्षणिक आराखडा, शैक्षणिक संधी आणि सुविधा यासंदर्भात विस्ताराने मार्गदर्शन करताना म्हणाले,"पुस्तकी ज्ञानासोबतच ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान युक्त कौशल्य आत्मसात करा. विविध कला आत्मसात करा. आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे करणारे हे शैक्षणिक धोरण आहे.


संगणकशास्त्र उपप्राचार्य प्रा. राजेंद्र लेले यांनी आपल्या मार्गदर्शन मनोगत, खडकी शिक्षण संस्थेच्या,महाविद्यालयाच्या परिसरातील अद्यावत आणि नाविन्यपूर्ण ज्ञान शिक्षण कौशल्य विभागाच्या उपक्रमांची, विविध शैक्षणिक संधी, योजना, सुविधांसह मिळणारे अत्याधुनिक ज्ञान शाखांचा परिचय करून दिला. 

 NAAC समितीचे "अ"मानांकन मिळालेल्या महाविद्यालयातील विविध कौशल्याधिष्ठित ज्ञानाच्या वेगवेगळ्या विभागाची कॅम्पस टूर अंतर्गत उपस्थित शाळेतील विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी ओळख करून घेतली.

   कार्यशाळेचे प्रमुख संयोजक, अर्थशास्त्र विभागप्रमुख,प्रा. जुगल नाईक यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतातून  कार्यशाळेचा हेतू आणि उद्देश विशद करून उपस्थितांचे स्वागत केले. 

  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अवलोकनार्थ कार्यशाळेचे  सूत्रसंवादन अविनाश कोल्हे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. शैलेंद्र काळे यांनी मानले.

यावेळी डॉ सुचेता दळवी प्रा रोकडे प्रा काढणे प्रा शिंदे प्रा काळे प्रा शेंडे , पटारे उपस्थित होते.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037



महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा