प्राचार्य शिवाजीराव कामथे व प्रा.अरविंद मोडक महात्मा फुले-सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 


पुणे दि. २३ (प्रतिनिधी) महात्मा ज्योतिराव फुले इतिहास अकादमी पुणे यांच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांना महात्मा फुले सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या वर्षीचा हा पुरस्कार पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे सचिव, पुणे विभाग टीडीएफ चे अध्यक्ष, पुणे शहरातील नामांकित अशा रामराज्य माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, आदरणीय शिवाजीराव कामथे सरांना तसेच पुणे शहर जुनिअर कॉलेज  टीडीएफचे सचिव, शिवाजी मराठा ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक आदरणीय अरविंद मोडक सरांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते तसेच मा.दत्तात्रय सावंत मा. शिक्षक आमदार, विपुल वाघमारे (IRS), मा. डॉ. श्रीमंत कोकाटे रावसाहेब मिरगणे शिक्षण निरीक्षक पुणे विभाग, मा. शिवाजीराव खांडेकर कार्यवाहक शिक्षकेतर महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करून सन्मानित करण्यात आले. 

प्राचार्य शिवाजीराव कामथे गेली 27 -28 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून आपल्या कुशल नेतृत्वाच्या माध्यमातून रामराज्य माध्यमिक विद्यालयाला  पुणे शहरातील एक नामांकित व उपक्रमशील शाळा म्हणून वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. तसेच ते मुख्याध्यापक संघ व शिक्षक संघटनांच्या माध्यमातून शाळा व शिक्षकांच्या विकासासाठी अविरतपणे कार्यरत आहेत.


प्राध्यापक अरविंद मोडक हे सुद्धा गेली 20-22 वर्ष शिवाजी मराठा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी विषयाचे अध्यापन करत असून महाविद्यालयात ते कृतिशील तसेच विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून ओळखले जातात. 

या दोघांना सदर पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037



महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा