शाळा सुधारण्यासाठी निधी उपलब्ध करू: आमदार सुनील शेळके यांचे आश्वासन

 


तळेगाव दाभाडे दि.२२ (प्रतिनिधी) : तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण मंडळाच्या शाळांमधील शैक्षणिक दर्जा चांगला असल्याने विद्यार्थी पटसंख्येचा वाढता आलेख कौतुकास्पद आहे. नगर परिषदेच्या शाळांची सर्वांगीण सुधारणा करून शैक्षणिक दर्जा आणखी उंचावण्याच्या हेतूने शासकीय निधीसह कंपन्यांचा सीएसआर फंड उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी दिले.


तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण विभागाच्या वार्षिक समारंभाला मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक ह्यांच्या अध्यक्षस्थानी होत होते. माजी नगराध्यक्ष अॅड. रवींद्रनाथ दाभाडे, विलास शहा, दीपक हुलावळे, संदीप शेळके, शिल्पा रोडगे, संध्या थोरात,  आदींसह उपस्थित होते. प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे यांनी आमदार श्री सुनील शेळके यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. १४ वर्षाखालील राष्ट्रीय एअर रायफल शूटींग स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती खेळाडू अर्शती विजयकुमार सरनाईक हिचा विशेष सत्कार करण्यात आला.


विविध तालुकास्तरीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्राथमिक शाळा क्रमांक सहाचे विद्यार्थी आणि संघानी सर्वाधिक प्रथम बक्षिसे पटकावीत अव्वलस्थान मिळविले. शिक्षणासह विद्यार्थ्यांमधील खेळांची आवड आणि कलागुणांना वाव देण्यास नगरपरिषद प्रशासन कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांनी खेळातील प्रावीण्य आणि कलागुणांना सिद्ध करून शाळेसह तळेगावचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले. रवींद्रनाथ दाभाडे, विलास शहा आदींनी मनोगत व्यक्त केले. गर्जा महाराष्ट्र सांस्कृतिक कार्यक्रमाचे उपप्रमुख सागर सांगळे यांनी प्रास्ताविक आणि अहवाल वाचन केले. शिक्षिका निकिता शितोळे, जयश्री उंडे यांनी सूत्रसंचालन केले.  मयुरेश मुळे यांनी आभार मानले. सदर वार्षिक स्नेहसंमेलनाच्या अगोदर क्रीडा प्रमुख श्री अनिल गाभणे व उपप्रमुख सागर उकिरडे यांनी सर्व शिक्षकांच्या मदतीने यशस्वीरित्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दिवशी प्रमुख छाया गाडे व उपप्रमुख सागर सांगळे यांनी यशस्वीरित्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037



महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गट एक ,दोन व तीन मध्ये अनुक्रमे पीएम श्री शाळा क्रमांक सहा, शाळा क्रमांक पाच व पीएम श्री शाळा क्रमांक सहा च्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. सदर वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली मिरघे, संध्या कुलकर्णी, अनिता तिकोने, विजया दांगट, वसुंधरा माळवदकर, वर्षा थोरात, संजय चांदे, राजेंद्र शिंदे, केशव चिमटे, यांनी  परीश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा