विपरीत परिस्थितीतुन मार्ग काढून शुटिंगचे प्रशिक्षण घेतले - ॲड.अजय सूर्यवंशी


खडकी: दि.3 (प्रतिनिधी) खडकी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारात  प्राविण्य मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे . खडकी शिक्षण संस्थेच्या श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल ज्युनिअर कॉलेजच्या इ.१२ वी सायन्स मधील विद्यार्थ्यीनी कु. सेजल राजू कांबळे हिने विपरीत परिस्थितीत शुटिंगचे प्रशिक्षण घेऊन दिल्ली या ठिकाणी ६७व्या राष्ट्रीय शुटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले.  

 श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात  शालेय समिती अध्यक्ष ॲड. अजय सूर्यवंशी सर  यांनी समारंभप्रसंगी प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक व  क्रीडाप्रमुख प्रा. प्रविण मुरकुटे सर यांनी केले.



     खडकी शिक्षण संस्थेने आंतरराष्ट्रीय मानकानुसार नुसार तयार केलेल्या शुटिंग रेंज मध्ये अनेक विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. सेजलला देखील यांचा  खूप फायदा झाला. प्रशिक्षक मा.आनंद बोऱ्हाडे यांनी खूप सहकार्य केले खडकी शिक्षण संस्थेच्या सहकार्याबद्दल संस्थेचे आभार सेजलची आई सुवर्णा कांबळे यांनी व्यक्त केले.

     यापुढे खडकी शिक्षण संस्था  शुटिंग रेंजचे प्रशिक्षण देणारी पंढरी होईल असा विश्वास सचिव आनंद छाजेड यांनी व्यक्त केला.

   संस्थेचे सचिव मा.आनंद छाजेड,  शालेय समिती अध्यक्ष ॲड.अजय सूर्यवंशी , सहसचिव प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

    याप्रसंगी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष अनिल मेहता,  सचिव आनंद छाजेड, सहसचिव सूरजभान आगरवाल,सहसचिव प्राचार्य डॉ. संजय चाकणे, शालेय समिती अध्यक्ष  ॲड.अजय सूर्यवंशी , संस्था समन्वयक डॉ .गजानन आहेर ,  शुटिंग प्रशिक्षक आनंद बोऱ्हाडे ,   दैनिक पुण्यनगरीचे मा.सुनिल मेहंदळे, मा. प्रसन्न फडके, उपप्राचार्य प्रा. बोटेकर सर,  शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब थोरात सर , शिक्षकेतर प्रतिनिधी अनिल तिळवणकर सर व सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सावंत सर यांनी तर आभारप्रदर्शन  उपप्राचार्य  प्रा.बोटेकर सर यांनी केले.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 
डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037



महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा